आरोग्य विभागात ‘लोकमत सरपंच अॅवॉर्डस’ : लोकसहभागातून फुलगाव झाले स्वच्छ व आरोग्यसंपन्न!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 03:10 AM2018-01-30T03:10:32+5:302018-01-30T03:10:54+5:30
आखीवरेखीव काटकोनात रस्ते, पूर्व-पश्चिम बाजारपेठ, गावच्या मध्यभागी शाळा, ग्रामपंचायत कार्यालय व पिण्याच्या पाण्याचा आड आणि भीमा नदीकिनारी सुंदर घडीव पाणवठे व कमानी घाट हे वर्णन आहे पेशवेकालीन फुलगाव या खेड्याचे. या गावाला जोड मिळाली प्रशासन आणि लोकसहभागाचा मेळ साधून फुलगावचे ‘स्वच्छ गाव-सुंदर गाव’ हे घोषवाक्य सार्थकी ठरले.
- के. डी. गव्हाणे
लोणीकंद : आखीवरेखीव काटकोनात रस्ते, पूर्व-पश्चिम बाजारपेठ, गावच्या मध्यभागी शाळा, ग्रामपंचायत कार्यालय व पिण्याच्या पाण्याचा आड आणि भीमा नदीकिनारी सुंदर घडीव पाणवठे व कमानी घाट हे वर्णन आहे पेशवेकालीन फुलगाव या खेड्याचे. या गावाला जोड मिळाली प्रशासन आणि लोकसहभागाचा मेळ साधून फुलगावचे ‘स्वच्छ गाव-सुंदर गाव’ हे घोषवाक्य सार्थकी ठरले.
ऐतिहासिक वसा असलेल्या या गावाला सरपंच सुनील शांताराम वागस्कर या युवकाने मेकॅनिकल इंजिनिअरच्या नोकरी सोडून गावच्या विकासाला दिशा दिली. आरोग्य विभागात ‘लोकमत सरपंच अॅवॉर्ड्सने त्यांना गौरविण्यात आले आहे.
यापूर्वी राज्य शासनाचे पर्यावरण संतूलन समृद्धी ग्रामयोजना पुरस्कार, महात्मा गांधी तंटामुक्त पुरस्कार, संत गाडगेमहाराज ग्रामस्वच्छता पुरस्काराने गौरविण्यात आलेच; पण जिल्हा परिषदेचा आदर्श सरपंच पुरस्कार २०१८ने प्रदान करून, ‘लोकमत सरपंच अॅवॉर्ड’साठी योग्य होती हे शिक्कामोर्तब केले. फुलगावमध्ये ३३७ उंबरा आहे. गावची लोकसंख्या २४०४ असून, श्रीक्षेत्र देहू-आळंदी रस्त्यालगत आणि भीमा नदीकाठावर निसर्गरम्य परिसराने गाव नटले आहे. गावामध्ये शंभर टक्के हगणदारी मुक्त आहे. ग्रामपंचायतीला आय.एस.ओ. प्रमाणपत्र मिळाले आहे. सरपंच सुनील शांताराम वागस्कर, उपसरपंच दादाभाऊ खुळे, महात्मा गांधी तंटामक्त समिती अध्यक्ष किशोर पाटोळे, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक बागडे आदींसह गावपुढारी व ग्रामस्थ गावविकासासाठी सातत्याने झटत आहेत. गावातील सर्वच नागरिकांचे आरोग्य सुधारण्यासाठी व रस्ते विकासासाठी प्राधान्य दिले आहे. गावात प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे. त्याचा नागरिक लाभ घेतात. तसेच सत्यसाई सेवा संघटना, पुणे यांच्या वतीने दरमहा आरोग्य कॅम्प घेतला जातो. यामुळेच गावात कुपोषणाचे प्रमाण शंभर टक्के नाही. तसेच गावात खासगी दवाखाना नाही. ग्रामरक्षक दल, तंटामुक्तअभियान, स्वच्छता अभियान, रोजगारनिर्मिती, कृषी तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, प्रशासन इ. प्रशासन लोकसहभाग अशा सर्व आघाडीवर ग्रामस्थांनी सुयश मिळविले. गावच्या विकासासाठी प्रशासन व लोकसहभाग अशा दोन आघाडीवर काम पाहते. नागरिकांसाठी सुख, मन:शांती विसाव्याचे हक्काचे ठिकाण म्हणजे भक्तीचे पौराणिक सर्व मंदिराचा सुंदर विकास केला आहे.
हरी उद्धव घोले यांनी १८६०मध्ये चावडीत शाळा चालू केली. १९३० मध्ये शाळेची इमारत बांधली. इ. ४ थीपर्यंत शाळा होती. १९६५ मध्ये ७ वी झाली. पंतोजीची शाळा म्हणून ओळख होती. नंतर ब्रिटिश ग्रॅन्ड देऊ लागले. लोकल बोर्ड स्वातंत्र्यानंतर जिल्हा परिषदेने या शाळेची जबाबदारी घेतली. आज गावकºयांनी हरी उद्धव धोत्रे माध्यमिक विद्यालय सुरू केले.
शुद्ध पाणीपुरवठा
पिण्याच्या पाण्याच्या योजनेला प्राधान्य दिले, सुमारे १ कोटी १९ लाख रुपयांचे नळपाणी पुरवठा योजना काम पूर्ण केले. ८ लाख रुपये आर.ओ. प्लांटची जोड दिली. त्यामुळे शुद्ध पाणीपुरवठा होऊ लागला, आरोग्य सुधारले.
बचत गटाच्या माध्यमातून विविध प्रकारचे लघुउद्योग व स्वयंरोजगार निर्मिती संगणक प्रशिक्षण, शिलाई मशिन काम, प्रशिक्षण कागदी पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण आरोग्य स्वयंरोजगारचे अनेक पर्याय उपलब्ध केले.
दुसरे बाजीराव पेशवे यांनी सुमारे १८०० व्या शतकात या गावची पुणे शहराजवळ एक विरंगुळ्याचे ठिकाण म्हणून विकास केला. भीमा नदीचा मोठा पाण्याचा डोह, तर दुसºया बाजूला डोंगर असल्याने मध्य नैसर्गिक सुंदर वनश्री होती. पूर्व-पश्चिम बाजारपेठ वसवली. फुलशहर असे नाव दिले. सुमारे १०० सरदारांना वाडे बांधून दिले. त्यांच्या सोईसाठी बारा बलुतेदारांना गावात आश्रय दिला. येथील बाजारपेठ प्रसिद्ध होती. बाजीराव पेशवे यांनी मुख्य सरदार त्रिंबक डेंगळे पाटील यांची येथे नेमणूक केली होती. त्यांना ब्रिटिशांनी पकडले. ठाणे तुरुंगात ठेवले, नंतर बापू गोखले यांनी जबाबदारी स्वीकारली. येथील जमिनीचे हत्तीखाना, बाग, पागा अशी नावे इतिहासाची जाणीव करून देताना, छत्रपती संभाजीमहाराजांच्या अंत्यविधीस फुले उधळली म्हणून फुलगाव असेही काही लोक सांगतात.