‘लोकमत सी नेमा’ची ‘काकण’ला झळाळी

By Admin | Published: April 12, 2015 12:42 AM2015-04-12T00:42:29+5:302015-04-12T00:42:29+5:30

‘लोकमत सी नेमा’ च्या उपक्रमाची उत्सुकता आणि त्यामध्ये सहभागी होण्यासाठी तारे- तारकांपासून ते ज्येष्ठांपर्यंतची उपस्थिती वेगळी ठरली.

'Lokmat Si Nema' is 'Kakan' bright | ‘लोकमत सी नेमा’ची ‘काकण’ला झळाळी

‘लोकमत सी नेमा’ची ‘काकण’ला झळाळी

googlenewsNext

पुणे : ‘लोकमत सी नेमा’ च्या उपक्रमाची उत्सुकता आणि त्यामध्ये सहभागी होण्यासाठी तारे- तारकांपासून ते ज्येष्ठांपर्यंतची उपस्थिती यांनी शुक्रवारची सायंकाळ मराठी चित्रपट सृष्टीसाठी सिझन्स मॉलमधील आगळी वेगळी ठरली. अभिनेत्री क्रांती रेडकरचा दिग्दर्शनाचा पहिलाच प्रयत्न असलेल्या ‘काकण’ चित्रपटाचा प्रिमीयर उत्साहात झाला.
चित्रपटांना मिळणारा लोकाश्रय अधिक भक्कम व्हावा, यासाठी ‘लोकमत सी नेमा’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
ज्येष्ठ अभिनेते- निर्माते महेश मांजरेकर, ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्यासह प्रसिध्द अभिनेत्री सई ताम्हणकर, उर्मिला कानेटकर, ज्येष्ठ अभिनेते अशोक शिंदे यांच्यासह पुण्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर या वेळी उपस्थित होते. ‘काकण’ चित्रपटातील कलाकार या सोहळ्याने भारावून गेले होते.
रांका ज्वेलर्स व चाटे ग्रुप आॅफ एज्युकेशन या उपक्रमाचे सहयोगी प्रायोजक होते. ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर, वरिष्ठ महाव्यवस्थापक निनाद देसाई आणि महाव्यवस्थापक मिलन दर्डा यांनी स्वागत केले. ‘लोकमत सी नेमा’संदर्भातील भूमिका मांडताना विजय बाविस्कर म्हणाले, ‘‘मराठी सिनेमाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि तो अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी ‘लोकमत’ नेहमीच कलावंतांच्या पाठीशी राहील. मराठी चित्रपटांच्या संवर्धनासाठी ‘लोकमत’ने हे नवे पाऊल उचलले आहे. (प्रतिनिधी)

‘लोकमत सी नेमा’ हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. या उपक्रमामुळे मराठी चित्रपट लोकांपर्यंत अधिक चांगल्या पद्धतीने जाण्यासाठी मदत होणार आहे. केवळ पुणे-मुंबईच नव्हे तर राज्याच्या इतर भागातही या पद्धतीचे उपक्रम राबविण्यासाठी ‘लोकमत’ने पुढाकार घ्यावा.
- मेधा व महेश मांजरेकर, निर्माता-दिग्दर्शक

‘लोकमत’चा हा उपक्रम हा खऱ्या अर्थाने फायदेशीर होणार आहे तो प्रेक्षकांसाठी. या उपक्रमामुळे मराठी चित्रपट घराघरांत पोहोचू शकणार आहे. मराठी माणसाने गर्व करावा असाच हा उपक्रम आहे. मराठी चित्रपटसृष्टीला ‘लोकमत’सारख्या मोठ्या वृत्तपत्रसमूहाचा पाठिंबा मिळणे ही कलाकारांसाठी खूप मोठी गोष्ट आहे.
- अशोक शिंदे, अभिनेता

‘लोकमत’ने बाजी चित्रपटाच्या प्रमोशनसाठीदेखील खूप मदत केली होती. ‘लोकमत सी नेमा’मध्ये चित्रपट पाहताना स्वत:च्या कुटुंबासमवेत चित्रपट पाहण्याचा अनुभव मिळतो. जे चित्रपट दर्जेदार आहेत; परंतु लोकाश्रय मिळत नाही अशा चित्रपटांसाठीदेखील प्रयत्न व्हायला पाहिजेत. महाराष्ट्रात ‘लोकमत’चे सर्वत्र जाळे आहे. या सर्व ठिकाणी हा उपक्रम सुरू केला पाहिजे.
- जितेंद्र जोशी, अभिनेता

‘लोकमत’च्या या उपक्रमामुळे मराठी चित्रपटांच्या यशस्विततेची पताका नक्कीच उंचावेल. आपला चित्रपट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचायला मदत होईल. मराठी चित्रपटांशी प्रेक्षक खऱ्या अर्थाने जोडला जाईल.
- ऊर्मिला कानेटकर,
अभिनेत्री

मराठीमध्ये खूप चांगले विषय हाताळले जात आहेत; पण चित्रपटांना म्हणावे तसे व्यासपीठ मिळत नाही. यादृष्टीने विचार केला तर ‘लोकमत’ने उचलले पाऊल हे वाखाणण्याजोगे आहे.
- बेला शेंडे

मराठी चित्रपट खूप कमी बजेटमध्ये बनवावे लागतात. अशा वेळेला खंबीर पाठिंब्याची गरज असते. हा पाठिंबा दिल्याबद्दल ‘लोकमत’चे आभार. या उपक्रमामुळे लोकांना नवनवीन चित्रपट पाहायला मिळतात. मराठी चित्रपटांना खास शोसाठी लढा चालू असताना हा प्रिमीयर चांगला होण्यासाठी ‘लोकमत सी नेमा’ उपक्रमाने एक चांगल पाऊल उचलले आहे. - क्रांती रेडकर, अभिनेत्री-निर्माती

‘लोकमत’च्या या उपक्रमामुळे मराठी चित्रपटांना आणखी चांगली संधी मिळणार आहे.
मराठी चित्रपटांना विविध महोत्सवांतून स्वत:चा वेगळेपणा सिद्ध करण्याची संधी मिळाली आहे. दर्जेदार विषय घेऊन मराठीची वाटचाल सुरू झाली आहे. चित्रपट घराघरांत पाहोचतील.
- शितल आणि वास्तुपाल रांका,
संचालक, रांका ज्वेलर्स

‘लोकमत’ने सुरू केलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. यामुळे मराठी चित्रपटांचा प्रिमीयर भव्य स्वरूपात व्हायला मदत होणार आहे.
- सई ताम्हणकर,
अभिनेत्री

‘लोकमत’चा हा उपक्रम मराठी चित्रपटांना बळ देणारा आहे. या उपक्रमामुळे मराठी प्रेक्षक आणि कलावंत अधिक जवळ येऊन त्यांच्यात संवाद वाढण्यास मदत होईल.
- शहाजी सोळुंके,
अतिरिक्त पोलीस आयुक्त

लोकमतने मराठी चित्रपटाला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केलेला हा उपक्रम अभिमानास्पद असाच आहे. ही खरोखरच खूप अनोखी कल्पना आहे.
- प्रकाश मुत्याळ, अतिरिक्त पोलीस आयुक्त

समाजात ‘लोकमत’ची भूमिका नेहमीच महत्त्वाची ठरली आहे. सर्वसामान्यांना ज्या गोष्टींची माहिती नाही, ती देण्याचा प्रयत्न ‘लोकमत’कडून सातत्याने केला जात आहे.
- फुलचंद चाटे, संचालक, चाटे ग्रुप आॅफ एज्युकेशन

Web Title: 'Lokmat Si Nema' is 'Kakan' bright

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.