लोकमत स्वरचैतन्य दिवाळी पहाट: नरक चतुर्दशीच्या दिवशी स्वरांचे अभ्यंगस्नान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 01:49 PM2023-11-08T13:49:53+5:302023-11-08T13:50:57+5:30

मैफलीत महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक सहभागी होणार आहेत...

Lokmat Swarachaitanya Diwali Dawn: Abhyangasnan of Swaras on Naraka Chaturdashi | लोकमत स्वरचैतन्य दिवाळी पहाट: नरक चतुर्दशीच्या दिवशी स्वरांचे अभ्यंगस्नान

लोकमत स्वरचैतन्य दिवाळी पहाट: नरक चतुर्दशीच्या दिवशी स्वरांचे अभ्यंगस्नान

पिंपरी : दिवाळी सणाच्या गोडव्याला सुरांच्या माधुर्याचा मुलामा देण्यासाठी 'लोकमत'च्या वतीने 'लोकमत स्वरचैतन्य दिवाळी पहाट'चे आयोजन करण्यात आले आहे. या मैफलीत महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रवेश पास विनामुल्य आहेत.

मंजूषा पाटील, जयदीप वैद्य, सावनी शेंडे, पं. संजीव अभ्यंकर आणि सावनी रवींद्र यांच्या स्वरांची जादू रसिकांना अनुभवता येणार आहे. रसिकांनी सहकुटुंब या सोहळ्याला उपस्थित राहून दिवाळीचा आनंद द्विगुणित करावा. या मैफलीसाठी पुनीत बालन ग्रुप, व्हिजन क्रिएटिव्ह ग्रुप, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट हे प्रायोजक आहेत.

कधी- रविवार, १२ नोव्हेंबर, पहाटे ५:३० वा

कुठे- श्री शिवाजी उदय मंडळ मैदान, चिंचवड

पास मिळण्याचे ठिकाण-

  • लोकमत पिंपरी कार्यालय : विशाल थिएटर, पिंपरी
  • व्हिजन क्रिएटिव्ह ग्रुप ऑफिस नं. ४-७, पाचवा मजला एमएसआर कॅपिटल, मोरवाडी, पिंपरी
  • व्हिजन व्हेनेसा फ्लॅट नं. ९-१४, सेक्टर ३२ए, निगडी रावेत प्राधिकरण
  • व्हिजन रिदम : शरद पवार कॉलेज शेजारी, मोशी आळंदी रोड, डुडुळगाव
  • काका हलवाई स्वीट सेंटर रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहासमोर, चिंचवड, एचडी- एफसी कॉलनी, शाहूनगर, चिंचवड
  • दिनेश अॅड्स, सेक्टर २५, प्राधिकरण रोड, निगडी
  • लोकमान्य मल्टिपर्पज को- ऑपरेटिव्ह सोसायटी पीसीएमसी लिंक रोड, चिंचवडगाव, प्राधिकरण रोड, निगडी, प्रीतम बिल्डिंग नाशिक हायवे, रूपी बँकेच्या समोर, भोसरी
  • प्रचिती पब्लिसिटी : महालक्ष्मी हाईट्स, सेंट्रल मॉलच्या मागे, मोरवाडी, पिंपरी,

Web Title: Lokmat Swarachaitanya Diwali Dawn: Abhyangasnan of Swaras on Naraka Chaturdashi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.