लोकमत स्वरचैतन्य दिवाळी पहाट: पिंपरी-चिंचवडकरांना मिळणार संगीतातून सात्विक आनंद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 12:47 PM2023-11-08T12:47:27+5:302023-11-08T12:54:09+5:30
पंडित संजीव अभ्यंकर यांना 'गॉडमदर' या हिंदी चित्रपटातील 'सुनो रे भैला' या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालेला आहे...
पुणे : सप्तसुरांचा अनोखा साक्षात्कार अनुभवण्यासाठी लोकमतच्या वतीने पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत व्हिजन क्रिएटिव्ह ग्रुपच्या सहयोगाने 'लोकमत स्वरचैतन्य दिवाळी पहाट'चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मेवाती घराण्याचे शास्त्रीय संगीत गायक पंडित संजीव अभ्यंकर आणि कुसुम शेंडे यांच्या शिष्या सावनी शेंडे यांच्या शास्त्रीय, उपशास्त्रीय गायनाच्या मैफलीचा आनंद लुटण्याची संधी पिंपरी- चिंचवडकरांना मिळणार आहे. तसेच मंजुषा पाटील, जयदीप वैद्य आणि सावनी रवींद्र यादेखील त्यांची कला सादर करणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रवेश पास विनामुल्य आहेत.
पंडित संजीव अभ्यंकर यांना 'गॉडमदर' या हिंदी चित्रपटातील 'सुनो रे भैला' या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट
पार्श्वगायकाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालेला आहे. आपल्या बहारदार गायकीने ते दिवाळीची पहाट सुरेल, सुरमय करणार आहेत. त्यांच्यासोबत आघाडीची शास्त्रीय संगीत गायिका आणि झाले मोकळे आकाश या मालिकेचे शीर्षकगीत गायलेल्या विदूषी सावनी शेंडे यांची जुगलबंदी पाहण्याचा आनंद रसिकांना मिळणार आहे. लोकमान्य मल्टिपर्पज को- ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स, गोयल गंगा ग्रुप, पीएनजी ज्वेलर्स यांचे कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले आहे.
हा कार्यक्रम पुढच्या रविवारी (दि. १२) पहाटे साडेपाच वाजता चिंचवडमधील श्री शिवाजी उदय मंडळ मैदान येथे होणार आहे. या कार्यक्रमासाठी पास उपलब्ध असून, खालील ठिकाणी पास मिळणार आहेत. स्वर चैतन्य दिवाळी पहाट हा कार्यक्रम लोकमतच्या वाचकांसाठी पर्वणी असणार आहे. सप्तसुरांचा अनोखा साक्षात्कार या कार्यक्रमाच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवडकर रसिकांना अनुभवता येणार आहे.
विनामुल्य प्रवेशिका मिळण्याची ठिकाणे
- लोकमत पिंपरी कार्यालय विशाल थिएटर, पिंपरी
- व्हिजन क्रिएटिव्ह ग्रुप ऑफिस नं ४-७ ५था मजला एमएसआर कॅपिटल, मोरवाडी, पिंपरी,
- व्हिजन व्हेनेसा फ्लॅट नं ९-१४, सेक्टर ३२ए, निगडी रावेत प्राधिकरण
- व्हिजन रिदम शरद पवार कॉलेजशेजारी, मोशी आळंदी रोड, डुडुळगाव
- काका हलवाई स्वीट सेंटर रामकृष्ण मोरे प्रेक्षगृहासमोर, चिंचवड एचडीएफसी कॉलनी, शाहूनगर, चिंचवड, दिनेश अॅड्स सेक्टर २५, प्राधिकरण रोड, निगडी
लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी : पीसीएमसी लिंक रोड, चिंचवडगाव, प्राधिकरण रोड़, निगडी प्रीतम बिल्डिंग नाशिक हायवे, रुपी बँकेच्या समोर, भोसरी प्रचिती पब्लिसिटी महालक्ष्मी हाइट्स, सेंट्रल मॉलच्या मागे, मोरवाडी, पिपरी,
कार्यक्रम स्थळ:
शिवाजी उदय मंडळ मैदान, चिंचवड
दिनांक- रविवार, १२ नोव्हेंबर
वेळ- पहाटे ५:३० वाजता
बदलत्या काळानुसार कलेतही तो बदल प्रतिबिंबित होतो. अशा वेळी ती कला अधिक रसिकांपर्यंत पोहोचणे, त्याला लोकाश्रय कसा मिळेल, या दृष्टीने प्रयत्न करणे कलाकाराचे काम आहे. संगीत मैफलीचे केलेले आयोजन श्रोत्याला निखळ व सात्विक आनंद देते, असा आजवरचा अनुभव आहे. रसिकांनाही एक आगळा वेगळा बदल हवा आहे, जो लोकमत स्वरचैतन्य दिवाळी पहाट कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे.
- पुनीत बालन, अध्यक्ष, पुनीत बालन ग्रुप
गाणं हे एक संवादाचे माध्यम आहे. सूर, ताल, लय यांच्या माध्यमातून गायकाला श्रोत्यांशी संवाद साधायचा असतो. आपल्या संस्कृतीतील बंध जपण्याचे काम गाण्यातून करायचे असते. त्या-त्या भौगोलिक परिवेशाला सांस्कृतिकतेचे वेगळे परिमाण देण्यात गाण्याचा वाटा मोठा आहे. त्याकरिता त्या कलेची साधना महत्वाची आहे. त्यामुळे लोकमत स्वरचैतन्य दिवाळी पहाट हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे रम्य असणार आहे.
- नरेश डंपीहोली, उपाध्यक्ष, व्हिजन क्रिएटिव्ह ग्रुप.