लोणावळा लोकलची वाटचाल ‘चाळीशी’ पल्ल्याड ...पण फरफट आहे सुरूच ..
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 07:39 PM2019-03-11T19:39:26+5:302019-03-11T19:46:29+5:30
एकीकडे प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना त्यांना आवश्यक सुविधा देण्यात रेल्वे प्रशासन हात आखडता घेत आहे. मागील ४१ वर्षांपासून लोणावळा लोकलची ही फरफट आजही सुरूच आहे...
पुणे : लोणावळा लोकल गाड्यांच्या फेऱ्या वाढविण्यासह स्वतंत्र रेल्वे लाईन टाकण्याच्या मागणीकडे रेल्वे प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले आहे. एकीकडे प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना त्यांना आवश्यक सुविधा देण्यात रेल्वे प्रशासन हात आखडता घेत आहे. मागील ४१ वर्षांपासून लोणावळा लोकलची ही फरफट आजही सुरूच आहे. जुन्या गाड्या, फेऱ्यांमधील अधिक अंतर, स्थानकांमधील असुविधा, फेऱ्या रद्दची टांगती तलवार या चक्रात ही सेवा अडकली आहे.
मध्य रेल्वने दि. ११ मार्च १९७८ रोजी पुणे ते लोणावळा दरम्यान लोकल सेवा सुरू केली. सध्याच्या तुलनेत त्यावेळी स्थानके व प्रवाशांची संख्या खुप कमी होती. सुरूवातीला केवळ सहा डब्यांची लोकल धावत असे. कालांतराने प्रवासी संख्या वाढत गेल्याने डबे व लोकल गाड्यांची संख्याही वाढत गेली. ठिकठिकाणी नवीन स्थानके करण्यात आली. सहा डब्यांनतर, सात, नऊ आता बारा डब्यांची लोकल धावत आहे. एकुण चार रेल्वेगाड्यांमार्फत दररोज दोन्ही बाजुने प्रत्येकी २२ फेºया होतात. सुमारे पावणे दोन लाख प्रवाशांना या सेवेचा फायदा होत आहे. सुमारे ६३ किलोमीटरचे हे अंतरया दोन स्थानकांदरम्यान शिवाजीनगर, खडकी, दापोडी, कासारवाडी, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, देहूरोड बेगडेवाडी, घोरावडी, तळेगाव, वडगाव, कान्हे, कामशेत व मळवली ही स्थानके आहेत.
मागील काही वर्षांत या मार्गावरील प्रवाशांची संख्या वेगाने वाढत गेली आहे. परिसरातील औद्योगिकरण, गावांचा झालेला विस्तार, नोकरीच्या वाढलेल्या संधी, शिक्षण संस्था यांमुळे नागरी वस्तीत मोठी वाढ झाली. परिणामी, लोकल सेवेचा प्रतिसाद वाढत गेला. पण त्या तुलनेत या लोकल सेवेकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
--------
तिसऱ्या व चौथ्या मार्गाची प्रतिक्षा
लोणावळा लोकल सध्या मुख्य दोन मार्गांवरूनच धावत आहे. या मार्गावरूनच एक्सप्रेस व मालगाड्या धावतात. लोकलसाठी स्वतंत्र मार्ग करण्याची मागणी अनेक वर्षांची आहे. पण तिसऱ्या आणि चौथ्या लाईनची केवळ घोषणा झाली आहे. काही वर्षांपूर्वी सर्वेक्षणाचेही काम झाले होते. पण अद्याप काम सुरू झाले नाही. नवीन मार्ग झाल्यास या मार्गांवरूनच लोकल सेवा सुरू होईल. त्यामुळे लोकल गाड्यांची संख्या व फेऱ्या वाढविणे शक्य होईल. पण पुणे विभागातील रेल्वे प्रशासन मात्र आता मुंबई रेल विकास कॉपोर्रेशनकडे बोट दाखवत आहे. लोकल संख्या वाढली नाही. दोन लोकलमधील अंतरही खुप आहे. जुने डबेच लोकलसाठी दिले जातात.
................................
लोणावळा लोकल सध्या मुख्य दोन मार्गांवरूनच धावत आहे. या मार्गावरूनच एक्सप्रेस व मालगाड्या धावतात. लोकलसाठी स्वतंत्र मार्ग करण्याची मागणी अनेक वर्षांची आहे. पण तिसऱ्या आणि चौथ्या लाईनची केवळ घोषणा झाली आहे. काही वर्षांपूर्वी सर्वेक्षणाचेही काम झाले होते. पण अद्याप काम सुरू झाले नाही. नवीन मार्ग झाल्यास या मार्गांवरूनच लोकल सेवा सुरू होईल. त्यामुळे लोकल गाड्यांची संख्या व फेºया वाढविणे शक्य होईल. पण पुणे विभागातील रेल्वे प्रशासन मात्र आता मुंबई रेल विकास कॉपोर्रेशनकडे बोट दाखवत आहे.