दिवाळी व छटपुजेमुळे पुण्यातून धावणाऱ्या लांबपल्ल्याच्या रेल्वे गाड्या 'फुल्ल'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2020 08:06 PM2020-11-09T20:06:27+5:302020-11-09T20:07:00+5:30

'अनलॉक'मध्ये रेल्वेकडून विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे दिवाळी व छटपुजेनिमित्त 'उत्सव विशेष'गाड्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे.

Long-distance trains overflow from Pune due to Diwali and Chhatpuja | दिवाळी व छटपुजेमुळे पुण्यातून धावणाऱ्या लांबपल्ल्याच्या रेल्वे गाड्या 'फुल्ल'

दिवाळी व छटपुजेमुळे पुण्यातून धावणाऱ्या लांबपल्ल्याच्या रेल्वे गाड्या 'फुल्ल'

Next
ठळक मुद्दे दिवाळीनंतर या गाड्यांचे आरक्षण काही प्रमाणात उपलब्ध

पुणे : दिवाळी व छटपुजेमुळे पुण्यातून उत्तरेकडील राज्यांत जाणाऱ्या बहुतेक सर्व रेल्वेगाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. तसेच राज्यांतर्गत काही गाड्याही दिवाळीच्या कालावधीत भरून धावणार आहेत. दिवाळीनंतर या गाड्यांचे आरक्षण काही प्रमाणात उपलब्ध असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

'अनलॉक'मध्ये रेल्वेकडून विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे दिवाळी व छटपुजेनिमित्त उत्सव विशेष गाड्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. मात्र, नियमित गाड्यांच्या तुलनेत या गाड्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे सणासाठी गावी जाणाऱ्यांना आता आरक्षण मिळविण्यासाठी वाट पाहावी लागत आहे. दिवाळीच्या कालावधीत जाणाऱ्या बहुतेक गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. प्रामुख्याने उत्तरेकडील राज्यात जाणाऱ्या गोरखपुर, दानापुर, जयपुर, झांसी, दरभंगा, निझामुद्दीन, इंदौर, जबलपुर, संत्रागाची, मंडुआडीह,  मुजफ्फरपुर, हावडा या गाड्यांची प्रतिक्षा यादी १०० ते ६०० पर्यंत गेली आहे.

दिवाळीनंतर छटपुजा असल्याने या कालावधीतही आरक्षण मिळत नाही. राज्यांतर्गत धावणाऱ्या नागपुर, अमरावती, अजनी या गाड्यांचे दिवाळी कालावधीतील आरक्षण फुल्ल झाले आहे. दिवाळीनंतर या गाड्यांची काही आसने रिकामी असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
----------
दिवाळी व छटपुजेमुळे उत्तरेकडील गाड्यांचे आरक्षण फुल्ल आहे. छटपुजेनंतरचेच आरक्षण उपलब्ध आहे. अन्य मार्गांवरही दिवाळीत गाड्यांना प्रतिक्षा यादी आहे. सणांसाठी रेल्वेकडून नियमित विशेष गाड्यांप्रमाणेच उत्सव विशेष गाड्याही सोडण्यात येत आहेत.
- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, पुणे
----------
सध्याची काही गाड्यांची स्थिती
मार्ग                         गाडीची क्षमता            आरक्षण
पुणे-दानापुर                 १५०६                       १८५९
पुणे-मंडुआडीह              १४९४                       १७०८
पुणे-संत्रागाची               १४४०                      १९३३
पुणे-जयपुर                  १४६२                       १८७८
पुणे-दरभंगा                 १४९४                       २०५०
पुणे-झांसी                   ११७०                       १६९६
पुणे-गोरखपुर              १६४६                       १९९०
पुणे-मुझफ्फरपुर          १६८०                      १७४५

Web Title: Long-distance trains overflow from Pune due to Diwali and Chhatpuja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.