पुणे व पिंपरी शहरात दारूच्या दुकानासमोर मद्यप्रेमींच्या लांबच लांब रांगा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 12:50 PM2020-05-04T12:50:54+5:302020-05-04T12:55:24+5:30

संचारबंदी, फिजिकल डिसन्टिसिंगचा फज्जा; लॉकडाऊनच्या पालनाकडे दुर्लक्ष

Long lines in front of liquor shops in Pune and Pimpri | पुणे व पिंपरी शहरात दारूच्या दुकानासमोर मद्यप्रेमींच्या लांबच लांब रांगा

पुणे व पिंपरी शहरात दारूच्या दुकानासमोर मद्यप्रेमींच्या लांबच लांब रांगा

googlenewsNext
ठळक मुद्देदारूसाठी शहरात गर्दीचा महापूर आल्याचे चित्र

पुणे व पिंपरी शहरात मद्यप्रेमींच्या दारूच्या दुकानासमोर लांबच लांब रांगा; लॉकडाऊनच्या पालनाकडे दुर्लक्ष
पिंपरी : राज्य सरकारने ३ मे नंतर लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला असला तरी दारूची दुकाने सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे पुणे तसेच पिंपरी शहरातील दारूच्या दुकानांबाहेर सोमवारी सकाळी  नागरिकांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. दारूसाठी शहरात गर्दीचा महापूर आल्याचे चित्र होते.
संपूर्ण पुणे जिल्हा रेडझोन मध्ये आहे. तसेच शहरात व पिंपरी-चिंचवड येथे दिवसागणिक कोरोनाग्रस्त रुग्ण वेगाने वाढत आहे. आढळत आहेत. तर शहरातील काही भागात जरी प्रशासनाने नियमांत शिथिलता आणली असली तरी प्रतिबंधित क्षेत्र (कन्टेंमेंन्ट झोन) देखील मोठ्या प्रमाणात असल्याचे समोर आले आहे. जीवनावश्यक वस्तू, औषधे यांच्यासोबतच किराणा दुकान व भाजीपाला व फळे विकायला देखील निर्बंध घालण्यात आले आहेत.

असे असले तरी दारूची दुकाने सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यामुळे नागरिकांनी सोमवारी सकाळपासून पुणे व पिंपरी शहरात ठिकठिकाणी दारूच्या दुकानांबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली. पुण्यातील सिंहगड रस्ता, हिंगणे खुर्द, कर्वेनगर, वारजे, धनकवडी, हडपसर, कोथरुड, डेक्कन, बावधन या परिसरात तर पिंपरीत आकुर्डी, चिंचवड, निगडी, चिखली, पिंपरी, सांगवी, भोसरी याभागांमध्ये ठिकठिकाणी गर्दी होती. दुचाकी, चारचाकी वाहने घेऊन नागरिक घराबाहेर पडले. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची संख्या वाढली. परिणामी संचारबंदी, फिजिकल डिसन्टिसिंगचा फज्जा उडवत नागरिकांकडून लॉकडाऊनच्या पालनाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले. काही ठिकाणी पोलिसांनी गर्दीला हुसकावून लावले. 

काही ठिकाणी दुकानेच ऊन उघडल्यामुळे मद्यप्रेमींच्या पदरी निराशा 

पुण्यासह दक्षिण उपनगरांमधील मद्यविक्री करणाऱ्या दुकानांसमोर सोमवारी सकाळी सकाळीच मद्यप्रेमींनी गर्दी केली होती. गेली चाळीस दिवस मद्य्याविना घशाला कोरड पडलेल्या मद्यप्रेमींनी सोमवारी सकाळीच दुकान गाठले. मात्र दहा वाजलेतरी दुकाने काही उघडली नाहीत आणि मद्यप्रेमींचा घसा ओला झाला नाही. त्यामुळे नाराज मद्यप्रेमी निराश होऊन घशा ओला न करताच माघारी फिरावे लागले.  

रविवारी सायंकाळी मद्यविक्री सुरू होणार अशी चर्चा होऊ लागली आणि त्याचे पडसाद सोमवारी सकाळीच सर्वत्र उमटले. दक्षिण उपनगरांमधील विविध वाईन शॉप समोर सकाळी ७ वाजल्यापासून मद्यप्रेमींनी रांगा लावल्या. तब्बल चाळीस दिवसांची प्रतिक्षा सहन केल्यानंतर आज कुठं दिलासा मिळाला होता. परंतु निराशाच झाली अशी प्रतिक्रिया वाईन शॉप उघडण्याची प्रतिक्षा करत असलेल्या मद्यप्रेमींकडून देण्यात आली. 

मद्यविक्रीची परवानगी देण्याचे अंतिम अधिकार हे जिल्हाधिकाऱ्यांचे आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आदेश येत नाही, तोपर्यंत वाईन शॉप सुरु करता येणार नाहीत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतरच पुढील कार्यवाही होणार हे आता स्पष्ट झाले आहे.

.......................................

शहरातील प्रतिबंधित क्षेत्रात दारूची दुकाने बंद राहणार आहेत. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग व शासनाच्या निदेर्शानुसार दारूची दुकाने सुरू होतील.
- संदीप बिष्णोई, पोलीस आयुक्त, पिंपरी - चिंचवड

Web Title: Long lines in front of liquor shops in Pune and Pimpri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.