लोणी काळभोर केंद्राला आठ दिवसांनंतर मिळाली लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:07 AM2021-07-04T04:07:48+5:302021-07-04T04:07:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क लोणी काळभोर : तब्बल आठ दिवसांनंतर कोरोना लस उपलब्ध झाल्याने लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केेंद्रासमोर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणी काळभोर : तब्बल आठ दिवसांनंतर कोरोना लस उपलब्ध झाल्याने लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केेंद्रासमोर शनिवार (दि.३) सकाळपासून नागरिकांची मोठी गर्दी केली होती. गर्दीचे मोठे प्रमाण व आरोग्य केेंद्रासमोर जागा कमी यामुळे नागरिकांना नाईलाजाने उन्हात उभे राहून आपला नंबर कधी येतो याची प्रतीक्षा करावी लागली.
प्राथमिक आरोग्य केेंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. डी. जे. जाधव व रूपाली बंगाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ मार्च ते आजअखेर कालावधीत एकूण २० हजार ५०८ जणांना लस देण्यात आली आहे. यामध्ये फ्रंटलाईन वर्कर, आरोग्य कर्मचारी, रक्तदाब व शुगर आदी आजार असलेल्यांसमवेत ४५ वर्षांवरील १२ हजार २४५ जणांना तर १८ ते ४४ वयोगटातील ८ हजार २६३ जणांचा समवेश आहे. शासनाच्या मार्गदर्शक निर्देशानुसार ४५ वर्षांवरील नागरिकांसह १८ ते ४५ वयोगटातील सर्वांना लस देण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. आठ दिवसांपासून या केंद्राला लस उपलब्ध झाली नव्हती. यामुळे लसीकरण बंद होते. नागरिक लसीच्या चौकशीसाठी येत होते. मात्र, त्यांना माघारी फिरावे लागत होते. आठ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर लस मिळाल्याने लसीकरण सुरू होताच गर्दीचे प्रमाण वाढले.
आरोग्य अधिकारी डॉ. जाधव व डॉ. बंगाळे यांनी आरोग्य केंद्रात जागा कमी असल्याने योग्य नियोजन करून दहाच्या ग्रुपने नागरिकांना आत प्रवेश देण्यात येत असल्याने आरोग्य कर्मचारी यांना काम करताना अडचण झाली नाही. यामुळे कसलाही गडबड गोंधळ न होता लसीकरण होत असल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. परंतु नागरिकांना उन्हात उभे राहावे लागत आहे, हे लक्षात येवूनही ग्रामपंचायत प्रशासन याबाबत काहीही उपाययोजना करत नाही, याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
४०० नागरिक लस न घेतात परतले घरी
लोणी काळभोर लसीकरण केंद्राला जवळपास आठ दिवसांनंतर ५०० डोस उपलब्ध झाले होते. दुपारी ३.३० वाजेेेपर्यंत ते संंपले. त्यामुळे सुुमारे ४०० नागरिकांना नाईलाजाने लस न घेता माघारी परतावे लागले. असे पुन्हा होवू नये म्हणून लोणी काळभोर येथे जास्त प्रमाणात लसीचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होते आहे.
फोटो - कोरोना लस घेण्याासाठी लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केेंद्रासमोर नागरिकांनी केलेली गर्दी.