लोणी काळभोर पोलिसांची १५३ जणांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:10 AM2021-04-20T04:10:59+5:302021-04-20T04:10:59+5:30
राज्य सरकारने शनिवार व रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता संचारबंदीचे आदेश दिले. तर इतर दिवशी सकाळी आठ ते दुपारी दोनपर्यंत ...
राज्य सरकारने शनिवार व रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता संचारबंदीचे आदेश दिले. तर इतर दिवशी सकाळी आठ ते दुपारी दोनपर्यंत लोणी काळभोर व कदमवाकवस्ती या दोन्ही ग्रामपंचायतीने लॉकडाऊनचा निर्णय घेतला. लोणी काळभोर पोलिसांनी गेल्या शनिवार(दि.१०) व रविवारी (दि.११) तर कालच्या शनिवार व रविवारी परिसरात विनामास्क व विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली. लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक निरंजन रणवरे, पोलीस अंमलदार राजेश दराडे, बालाजी बांगर, सोनवणे यांनी ही कारवाई केली.
नियमांचे सर्रास उल्लंघन करून भरतोय बाजार
भाजीपाला, फळे खरेदी करण्यासाठी किंवा किराणा सामान आणण्यासाठी बाहेर पडलेले नागरिक शासनाच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करताना दिसून येत आहेत. कवडीपाट टोल नाक्याजवळ हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भाजीपाला बाजारात नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. इतर ठिकाणी भाजीपाला मार्केटमध्ये अशीच परिस्थिती आहे. अनेक नागरिक नियमांचे पालन करत नसल्याचे दिसून येत आहे.
चौकट
७६ हजारांची वसुली
शनिवारी (दि.१०) ३० नागरिकांकडून १५००० दंड वसूल करण्यात आला.
रविवारी (दि.११) २७ जणांवर कारवाई करून १३५०० रुपये दंड आकारण्यात आला. शनिवारी (दि.१७) ४७ नागरिकांवर कारवाई करून २३५०० रुपये दंड वसूल करण्यात आला.
रविवारी (दि.१८) ४९ जणांकडून २४५०० रुपये वसूल करण्यात आले. एकूण १५३ जणांवर कारवाई करून ७६५०० रुपये दंड वसूल करण्यात आला.
फोटो ओळ
लोणी काळभोर कॉर्नरला मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करताना सहा.पोलीस निरीक्षक निरंजन रणवरे व इतर अंमलदार.