अर्थव्यवस्थेचा कणा’ म्हणून कृषी क्षेत्राकडे पहा : सुनील राशिनकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:12 AM2021-09-22T04:12:58+5:302021-09-22T04:12:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नसरापूर : "अर्थव्यवस्थेचा कणा’ म्हणून कृषी क्षेत्राकडे बघितले जाते. जिल्हा आणि तालुका स्तरावरील कृषी योजना पोहोचविण्यासाठीचे ...

Look at agriculture as the backbone of the economy: Sunil Rashinkar | अर्थव्यवस्थेचा कणा’ म्हणून कृषी क्षेत्राकडे पहा : सुनील राशिनकर

अर्थव्यवस्थेचा कणा’ म्हणून कृषी क्षेत्राकडे पहा : सुनील राशिनकर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नसरापूर : "अर्थव्यवस्थेचा कणा’ म्हणून कृषी क्षेत्राकडे बघितले जाते. जिल्हा आणि तालुका स्तरावरील कृषी योजना पोहोचविण्यासाठीचे काम कृषी अधिकारी करत आहेत. कृषी विभागावरील कामाचा ताण वाढतोय. त्यांच्या कामाची नोंद घेऊन त्यांना योग्य ते सहाय्य करा, असे आवाहन कृषि विभागाचे निवृत्त कृषी पर्यवेक्षक सुनील राशिनकर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले.

नसरापूरचे भूमिपुत्र निवृत्त कृषी पर्यवेक्षक सुनील राशिनकर हे ३७ वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाले आहेत. त्या कार्यक्रमाचे कृषी उत्पन्न बाजार समिती भोर उपबाजार आवार येथे घेतलेल्या कार्यक्रमाचे वेळी राशिनकर यांनी आपले विचार शेतकऱ्यांसमोर मांडले. यावेळी कृ.उ.बा. समिती भोरचे उपसभापती संपतदादा आंबवले, नसरापूरचे कृषी अधिकारी राहुल दिघे, ख. वि. संघ भोरचे संचालक ज्ञानेश्वर झोरे, नसरापूरचे उपसरपंच गणेश दळवी, सेवा निवृत्त सैनिक अनिल शेटे, ग्रा. पं. सदस्य इरफान मुलाणी, डॉ. विशाल भुतकर, ख.वि.सं.नसरापूरचे व्यवस्थापक दिवाणजी इंगुळकर, शेतीनिष्ठ शेतकरी विजय शिळीमकर, कोलावडीचे माजी सरपंच मोरे, रामदास धावले, अनिल भिलारे, पांडुरंग जाधव, अर्जुन तिखोळे, दत्ता दसवडकर ,प्रसाद शेटे आदी पंचक्रोशीतील शेतकरी बंधू उपस्थित होते.

फोटो ओळ : नसरापूर (ता.भोर) येथे कृषी विभागाचे निवृत्त कृषी पर्यवेक्षक सुनील राशिनकर, संपत आंबवले व शेतकरी

Web Title: Look at agriculture as the backbone of the economy: Sunil Rashinkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.