लोणावळ्यात ख्रिसमस, न्यू ईयर पार्ट्यांवर नजर

By admin | Published: December 23, 2016 12:39 AM2016-12-23T00:39:28+5:302016-12-23T00:39:38+5:30

लोणावळ्यात ख्रिसमस व न्यू इयरच्या पार्टीकरिता राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. या पर्यटकांचे शहरात

Look at Christmas, New Year parties in Lonavla | लोणावळ्यात ख्रिसमस, न्यू ईयर पार्ट्यांवर नजर

लोणावळ्यात ख्रिसमस, न्यू ईयर पार्ट्यांवर नजर

Next

लोणावळा : लोणावळ्यात ख्रिसमस व न्यू इयरच्या पार्टीकरिता राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. या पर्यटकांचे शहरात स्वागत आहे. मात्र, पर्यटनाच्या नावाखाली हुल्लडबाजी करणाऱ्या तळीरामांवर प्रचलित कायद्यानुसार कडक कारवाई करणार आहे, अश्ी माहिती शहरचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी दिली.
हुल्लडबाजांचा अड्डा अशी ओळख बनलेल्या लायन्स पॉइंटवर सायंकाळी सातनंतर पर्यटकांना बंदी करण्यात येणार असून, परिसरात कोणी आढळल्यास कारवाई करण्यात येणार आहे.
जाधव म्हणाले, ‘‘काही पर्यटक नशेत बेदरकारपणे वाहने चालवितात. काही धांगडधिंगा करुन सार्वजनिक शांतता भंग करतात. महिलांची छेडछाड, वाहतूक नियमांचा भंग करत वेगात वाहने चालविणे, सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करणे अशा तळीरामांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. यासह खासगी बंगले, फार्म हाऊसमध्ये रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या पार्ट्या यांच्यावर पोलिसांची करडी नजर असणार आहे.
ख्रिसमस व न्यू इयरच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र हाय अलर्ट असल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी काय खबरदारी घ्यावी, याकरिता पोलीस निरीक्षक जाधव यांनी हॉटेल व्यावसायिकांच्या बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी नगरसेवक श्रीधर पुजारी, नितीन आगरवाल, हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष मजहर काँट्रॅक्टर, प्रा. डॉ. जिभाऊ बच्छाव, राजेश आगरवाल, शिला बनकर, यमुना साळवे, विजय शेवाळे आदी उपस्थित होते.(वार्ताहर)

Web Title: Look at Christmas, New Year parties in Lonavla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.