इराणी हॉटेलचं रूपडं बदलतंय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:11 AM2021-02-27T04:11:10+5:302021-02-27T04:11:10+5:30
आता या इराणी पध्दतीच्या हॉटेलांना १०० वर्षांपेक्षा मोठा कालावधी लोटला गेला आहे. तरीही 'अस्सल पुणेरी खवय्यां'शी नाळ कायम राखत ...
आता या इराणी पध्दतीच्या हॉटेलांना १०० वर्षांपेक्षा मोठा कालावधी लोटला गेला आहे. तरीही 'अस्सल पुणेरी खवय्यां'शी नाळ कायम राखत ते ग्राहकांच्या सेवेत अथक रुजू आहेत.
महाराष्ट्र आणि विशेषतः पुणेरी खाद्यसंस्कृती जपण्याचं आणि तिला लोकांपर्यंत पोचवण्यासाठी अधिक प्रभावीपणे काम करून तो विश्वास आजतागायत कायम राखणाऱ्या या इराणी हॉटेलांचे स्वरूप आणि रुपडं आता बदलत आहे.
पुण्यातील अनेक चळवळी, वेगवेगळ्या विचारधारेला मानणाऱ्या विचारवंतांचा इराणी हॅाटेल गप्पांचा अड्डा राहिला आहे. अनेक चळवळी आणि वेगवेगळ्या स्थित्यंतरांची हे इराणी पध्दतीचे साक्षीदार आहेत.
आपल्या मेनूमध्ये चांगली पोषकद्रव्ये आणि प्रथिने मिळतील, याची विशेष खबरदारी घेतली जाते. त्यामध्ये इराणी चहा, बन मस्का, पनीर भुर्जी आणि चिली चिज, ग्रिल सँडविच अशा चवदार पदार्थांचा समावेश आहे. पूर्वी केवळ विद्यार्थ्यांचा घोळका दिसणाऱ्या या हॉटेलांचा आता कायापालट होत असून, सहकुटुंब ग्राहकांनी भेट द्यावी, असे प्रयत्न होत आहेत.
आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी सर्व गटातील लोक इराणी हॅाटेलात गेल्या दहा दशकांपासून येताहेत, हीच या इराणी हॉटेल व्यावसायिकांची मोठी संपत्ती आहे.
बदललेल्या काळाबरोबर बदलताना ग्राहकांना अजून कशा वेगवेगळ्या सुविधा देता येईल, याचा विचार या व्यावसायिकांनी नेहमीच केला. याचाच परिणाम म्हणून मोठमोठ्या राज कपूरसारख्या प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांनीसुद्धा येथील पदार्थांचा आस्वाद घेतला आहे, तसेच अभिनेते सुनील शेट्टी, दिग्दर्शक अमोल पालेकर, अतुल कुलकर्णी आणि क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीचाही समावेश आहे.