दिसता नावे जनी, वाटे आम्हा लाज
By Admin | Published: March 26, 2017 01:19 AM2017-03-26T01:19:55+5:302017-03-26T01:19:55+5:30
दौंड शहरात नगर परिषदेच्या विविध कराच्या थकबाकीदारांच्या नावाचे फलक शहरातील मुख्य चौकातलावल्याने या
दौंड : दौंड शहरात नगर परिषदेच्या विविध कराच्या थकबाकीदारांच्या नावाचे फलक शहरातील मुख्य चौकातलावल्याने या फलकावरील नावे वाचण्यासाठी शहरातील मुख्य चौकात गर्दी होत आहे.
राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिष्ठित लोकांची नावे थकबाकीदारांच्या यादीत झळकल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या भुवया उंचवल्या आहेत.
नावे चौकात जाहीर फलकावर लावल्या गेल्याने प्रतिष्ठित लोकांनी कर भरण्यास सुरुवात केली आहे. आमचा थकीत कर तातडीने भरतो; मात्र जाहीर फलकावरील नावांवर चिकटपट्ट्या चिटकवून झाकण्यात याव्यात, अशी मागणी थकबाकीदार नागरिक की ज्यांची नावे फलकावर आहेत, असे नागरिक मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात यांच्याकडे करीत आहेत.
कर भरला, त्यांची नावे खोडण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आलेले आहे. थकबाकीदारांची नावे उंचावर लटकविलेली असल्याने
कर भरल्यानंतर नावे खोडण्यासाठी अग्निशामक बंबाचा वापर करण्यात येत आहे. अग्निशामक बंबावर चढून नगर परिषदेचे कर्मचारी थकबाकीदारांची नावे खोडत असल्याचे एकंदरीत चित्र आहे. (वार्ताहर)