एक, दोन नाही तर सहा वेळा क्वारंटाइनचा अनुभव घेतलेला ' तो ' काय म्हणतो बघा....
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 01:17 PM2020-03-26T13:17:12+5:302020-03-26T13:18:24+5:30
पुण्यातील रुग्णाने १९९८ पासून २००६ पर्यंत ६ वेळा घेतला अनुभव
अमृत सहाणे-
पुणे : क्वारंटाइन म्हणजे नेमकं काय? हा अनुभव पुण्यातील एका रुग्णाने १९९८ ते २००६ या काळात तब्बल ६ वेळा घेतला आहे. मुंबईतील टाटा हॉस्पिटलमधील रेडिएशन मेडिसिन सेंटरमध्ये झालेल्या उपचाराचा अनुभव रुग्णाने लोकमतकडे व्यक्त केला. तसेच क्वारंटाइन (विलगीकरण) रुग्ण आपले बांधवच आहेत, त्यांना गावांनी वाळीत टाकू नये, असे आवाहनही केले आहे.
एका रुग्णाला १९९८ मध्ये गळ्याजवळ छोटीशी गाठ असल्याचे जाणवले. त्यांनी पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयात सर्व तपासण्या केल्या. डॉक्टरांनी आॅपरेशन ठरवले. कॅन्सरमधील एक प्रकार थायरॉईड असल्याचे निदान झाले. यावेळी ते १७ वर्षांचे होते. घरातील सर्वजण चिंतेत होते. डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी मुंबईतील टाटा हॉस्पिटलमध्ये जावे लागेल आणि आयुष्यभर एक गोळी घ्यावी लागेल याची कल्पना दिली. रुग्णाने जिद्दीने होकार दिला आणि घरातील आई-वडिलांनी देखील मुंबईला जाण्याची तयारी केली.
दरम्यान पुण्यातील आणखी एका डॉक्टरांचा सल्ला घेतला. त्यानंतर कमला नेहरू येथे दुसºयांदा छोटेसे आॅपरेशन झाले. सगळे अहवाल घेऊन ते मुंबईत नातेवाईंकाच्या घरी गेले. टाटा हॉस्पिटलमध्ये अ?ॅडमिट झाले. तेथे आॅपरेशन झाले. सगळ््या तपासण्या झाल्या. त्यानंतर रेडिएशन मेडिसिन सेंटरमध्ये औषध देऊन क्वारंटाइनसाठी चार ते पाच दिवस ठेवण्याचे निश्चित झाले. या वेळी काय काळजी घ्यावी, याची माहिती डॉक्टरांनी दिली. जून १९९८ ला पहिल्यांदा औषध दिल्यानंतर दोन रूममध्ये चौघांना क्वारंटाइन केले होते. औषध घेतल्यानंतर रूममध्ये जायचे, आत जाताना टॉवेल, ब्रश, पेस्ट, साबण एवढेच आत घेऊन जायचे. शरीरातील औषधाचे प्रमाण कमी होत नाही, तोपर्यंत रूममधून बाहेर काढत नव्हते. डॉक्टर दिवसातून दोन वेळा औषधाचे प्रमाण मशिनद्वारे तपासत होते.
चार ते पाच दिवसांनी रूममधून बाहेर येताना अंघोळ करून बाहेर येणे सर्व कपडे साहित्य त्या रूममध्येच सोडणे नंतर परत दुसºया रूममध्ये आल्यावर अंघोळ करून मग बेडवर जावे लागत, असा हा संघर्ष सात वर्षे करावा लागला आहे. क्वारंटाइन असताना वॉर्डबॉय, मावशींपासून ते नर्स, डॉक्टर हे सर्व एका कुटुंबांप्रमाणे जपतात, काळजी घेतात. इतरांना संसर्ग होऊ नये, यासाठी क्वारंटाईन केले जाते. त्यात काळजी घेणे एवढेच अपेक्षित असते.
कोरोना संशयितांना वाळित टाकू नका
आता कोरोनाचे जे संकट जगावर आलेले आहे. यात आपल्या देशातील परदेशातून आलेल्या लोकांना होम क्वारंटाइनचे शिक्के मारले जात आहेत. अनेकांना क्वारंटाइन केले जात आहे. मात्र, क्वारंटाइन केलेले रुग्ण हे आपले बांधवच आहेत. त्यांना वाळीत न टाकता त्यांच्यापासून संसर्ग होणार नाही, एवढीच काळजी घ्यायला हवी. सरकारने वेळोवेळी केलेल्या सूचना आणि आदेशांचे पालन करून सर्वांनीच घरी थांबून स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन आता ठणठणीत बरे झालेल्या रुग्णाने केले आहे.