मॉल, मल्टिफ्लेक्सकडून लूटच
By admin | Published: February 16, 2015 04:40 AM2015-02-16T04:40:08+5:302015-02-16T04:40:08+5:30
महापालिकेकडून मॉल, मल्टिफ्लेक्स, थिएटर व हॉस्पिटल्स यांना वाहनांचे पार्किंग उभारण्यासाठी चटई क्षेत्र निर्देशांकामध्ये
पुणे : महापालिकेकडून मॉल, मल्टिफ्लेक्स, थिएटर व हॉस्पिटल्स यांना वाहनांचे पार्किंग उभारण्यासाठी चटई क्षेत्र निर्देशांकामध्ये (एफएसआय) सवलत दिली जात असतानाही त्यांच्याकडून चारचाकी वाहनांसाठी ६० ते ८० रुपये, तर दुचाकी वाहनांसाठी २० ते ४० रुपये इतक्या मोठ्या प्रमाणात शुल्क आकारून लूट केली जात आहे. याविरोधात महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी आवाज उठवूनही प्रशासनाकडून त्यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस दाखविले जात नाही.
शहरामध्ये वाहनांच्या पार्किंगसाठी जागा अपुऱ्या पडू लागल्याने वाहने लावायची कुठे याचा मोठा प्रश्न उभा राहत आहेत. अरुंद असलेल्या रस्त्यांवर चारचाकी व दुचाकी वाहने लावली जाऊन वाहतूककोंडीची समस्या निर्माण होऊ लागली. मॉल, मल्टिफ्लेक्स, थिएटर, हॉस्पिटल यांनी त्यांच्या जागेमध्येच पार्किंगची सोय उपलब्ध करावी याकरिता त्यांना एफएसआयमधून सवलत देण्यात येत आहे. त्याआधारे इमारतीच्या तळघरात दुमजली मोठे पार्र्किं ग लॉट मॉल्स, मल्टिफेल्क्स यांनी उभारले.
मॉल्समध्ये सुरुवातीच्या काळात पार्किंगसाठी ५ रुपये, १० रुपये असे शुल्क आकारले जात होते. मात्र, त्यानंतर त्यामध्ये प्रचंड वाढ करीत ते शुल्क तिप्पट, चौपट झाले आहे. सुरक्षारक्षक ठेवून स्वत: व्यवस्थापनाकडून हे शुल्क वसूल केले जात आहे.