लुटले वाहनखरेदीचे सोने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2016 02:46 AM2016-10-12T02:46:36+5:302016-10-12T02:46:36+5:30

गेल्या वर्षी मंदीच्या गर्तेत सापडलेल्या वाहन उद्योगाला यंदा झालेल्या मुबलक पावसाने चांगलेच बळ दिले आहे. गतवर्षीपेक्षा यंदा

Looted VehiclePurchase Gold | लुटले वाहनखरेदीचे सोने

लुटले वाहनखरेदीचे सोने

Next

पुणे : गेल्या वर्षी मंदीच्या गर्तेत सापडलेल्या वाहन उद्योगाला यंदा झालेल्या मुबलक पावसाने चांगलेच बळ दिले आहे. गतवर्षीपेक्षा यंदा वाहनखरेदीत १८३ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. मंगळवारी प्रादेशिक परिवहन कार्यालयात तब्बल ६ हजार ९११ वाहनांची नोंदणी झाली असून, त्यातून प्रादेशिक परिवहन विभागाला कर व नोंदणी शुल्कापोटी २० कोटी ३८ लाख २ हजार ६०१ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गतवर्षीपेक्षा यंदा वाहनांच्या खरेदीत १८३ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे.
विजयादशमीच्या मुहूर्तावर नागरिकांनी ४५४० दुचाकी व १७६० चारचाकी वाहने घरी आणली. याशिवाय आॅटो रिक्षा, टुरिस्ट टॅक्सी, प्रवासी बस, मालवाहू वाहनांची देखील नागरिकांनी खरेदी केली. दसऱ्याच्या दिवशी वाहन घरी आणण्यासाठी आरटीओमध्ये आठवडाभर अगोदरच वाहनांच्या नोंदणीसाठी रांगा लागल्या होत्या. दसऱ्याच्या दिवशी देखील परिवहन कार्यालय सुरू होते. यंदा वाहन नोंदणी शुल्कातून ८ लाख ५६ हजार ३४० व करापोटी २० कोटी २९ लाख ४६ हजार २६१ रुपयांचा महसूल जमा झाला.
गतवर्षी या दिवशी २ हजार ५३३ दुचाकी व १ हजार ९४ चारचाकी अशा एकूण ३ हजार ७७३ वाहनांची विक्री झाली होती. त्यातून नोंदणीपोटी ४ लाख २५ हजार २२० व करापोटी ११ कोटी ५ लाख ६५ हजार ६७० रुपयांचा महसूल जमा आला होता. यंदा सर्वच वाहनांच्या खरेदीत जवळपास दुप्पटीने वाढ झाली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा ३ हजार २४३ वाहनांची अधिक विक्री झाली. त्यात २ हजार ७ दुचाकी व ६६६ चारचाकी वाहनांची खरेदी गेल्या तुलनेत अधिक झाली आहे. एएयूव्ही व दुचाकींमध्ये ११० सीसीच्या पुढील वाहनांची क्रेझ वाढत आहे. यामुळे बुलेटसारख्या वाहनांना, तर चारचाकींमध्ये चार लाख ते वीस लाखांमधील वाहनांना पसंती दिली जाते. तसेच काही ठरावीक वर्गाने बीएमडब्लू, मर्सिडीज बेंझ, आॅडी या वाहनांच्या खरेदीला दिली. (प्रतिनिधी)


वाहन प्रकारएकूण संख्यानोंदणी शुल्क जमा झालेला कर -
दुचाकी४,५४०२,७४,४२०२,८७,६३,३०८
चारचाकी१७६०३५५८२०१६,७०,०४,८३२
आॅटो रिक्षा८०२४,०००३,०८,९२४
टुरिस्ट टॅक्सी२,४५७३,५००१९,८६,०००
प्रवासी बस१८१२,०००४,०८,३५२
मालवाहू वाहने२७३१,१६,६००४४,७४,८४५
एकूण६,९१६८,५६,३४० २०,२९,४६,२६१

Web Title: Looted VehiclePurchase Gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.