लुबाडणाऱ्यास अटक
By admin | Published: March 20, 2017 04:37 AM2017-03-20T04:37:13+5:302017-03-20T04:37:13+5:30
दुचाकीवरुन जाणाऱ्या तरुणास धमकी देऊन त्याच्याकडील मोबाईल व एटीएममधून पैसे काढायला लावून लुबाडणाऱ्यास वानवडी
पुणे : दुचाकीवरुन जाणाऱ्या तरुणास धमकी देऊन त्याच्याकडील मोबाईल व एटीएममधून पैसे काढायला लावून लुबाडणाऱ्यास वानवडी पोलिसांनी अटक केली आहे़
सुरेंद्र प्रेमदास वंजारी (वय २२, रा़ गोकुळनगर) असे त्याचे नाव आहे़ याप्रकरणी सोहेब सरफराज खान (वय १९, रा़ कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे़ खान हे १६ मार्चला सायंकाळी सव्वाचार वाजता दुचाकीवरुन जात असताना वंजारी याने त्यांच्या दुचाकीला धडक दिली़ दुचाकीचे नुकसान झाले, त्याची भरपाई दे, असे म्हणून त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावूून घेतला व कोंढव्यातील एटीएममधून १ हजार रुपये काढायला लावून ते जबरदस्तीने काढून घेतले होते़ पोलिसांनी दुचाकीच्या क्रमांकावरुन वंजारी याला अटक करून रविवारी न्यायालयात हजर केले़ तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली़ न्यायालयाने एक दिवसाची कोठडी मंजूर केली़