पेट्रोलपंपांवर सर्रास लुबाडणूक

By Admin | Published: September 18, 2014 12:36 AM2014-09-18T00:36:18+5:302014-09-18T00:36:18+5:30

पेट्रोल भरल्याच्या शुल्कामध्ये कमी-अधिक प्रमाणात तफावत ठेवली जात असल्याचे ‘लोकमत’ प्रतिनिधींना बुधवारी आढळून आले.

Looters on petrol pumps | पेट्रोलपंपांवर सर्रास लुबाडणूक

पेट्रोलपंपांवर सर्रास लुबाडणूक

googlenewsNext
पिंपरी : शहरातील अनेक पेट्रोलपंपांवर पेट्रोल भरण्यादरम्यान  मीटरच्या आकडय़ांमध्ये व प्रत्यक्ष पेट्रोल भरल्याच्या शुल्कामध्ये कमी-अधिक प्रमाणात तफावत ठेवली जात असल्याचे ‘लोकमत’  प्रतिनिधींना बुधवारी आढळून आले. काही ठिकाणी अधिकृत बिलाऐवजी तात्पुरते बिल, तर कुठे आकडे न भरताच कोरे बिलही हातात टेकवले गेले. पेट्रोल भरतेवेळी प्रवाहित होताना दिसण्याठीच्या पारदर्शक वाहिन्यांचा अभाव असल्याने   याबातची साशंकता पुन्हा समोर आली आहे. 
  पेट्रोल पंपांवर जाणीवपूर्वक थेट पेट्रोल देताना ग्राहकाने दिलेल्या पैशांपेक्षा दहा, वीस पैसे ते ऐंशी पैशांर्पयत किमतीचे पेट्रोलच भरले जात नसल्याच्या तक्रारी नागरिकांमधून वाढू लागल्या आहेत. तसेच प्रत्येकाला पावती दिली जात नसल्याने व पूर्वी पेट्रोल भरणा:याचा आकडा तसाच ठेवून पुढील ग्राहकाला पेट्रोल भरले गेल्याने अनेक ठिकाणी भांडणोही होतात या परिस्थितीचा मागोवा घेण्यासाठी ‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष पाहणी करून व स्वत: अनुभव घेतल्यावर काही गलथानपणाच्या बाबी निदर्शनास आल्या आहेत. 
एका पंपावर प्रतिनिधीने 4क् रुपयांचे पेट्रोल दुचाकीत भरण्यास सांगितले असता कर्मचा:याने इलेक्ट्रिक मीटरनुसार आकडे दाबून पेट्रोल भरले. पण पावती मागितल्यावर चक्क कोरी पावती हातात टेकवली. थेट पेट्रोल भरताना काही ग्राहकांना पंचवीस ते चाळीस पैशांचे कमी पेट्रोल दिले जाते. काही ठिकाणी लिटरनुसार इंधन भरण्याची मागणी करणारांना सुटे एक ते चार रुपये देण्यास जवळ नसल्याचे सांगून पुढच्या वेळी परत घ्या, असे सांगितले जाते. बहुतेक ठिकाणी पेट्रोल भरण्याच्या शेवटी कर्मचा:याकडून घाईतच पाइप टाकीबाहेर काढल्याने मोठय़ा प्रमाणात इंधन खाली सांडले जाते. त्याचे नुकसान ग्राहकांनाच सहन करावे लागते. ी कर्मचा:यांना इंधन नासाडी टाळण्याच्या सूचना देणो गरजेचे आहे. 
एका पंपावर पन्नास रुपयांचे पेट्रोल देण्याची मागणी केल्यावर ते 5क्.क्7 रुपयांचे दिले गेले खरे; मात्र पेट्रोल भरण्याची नळी पारदर्शक नसल्याने परिणामी त्यामधील फिरती भिंगरी दिसण्याचा प्रश्नच उरला नाही. तर काही ग्राहकांना 5क् ते 7क् पैशांर्पयत जादा पेट्रोल दिले जात असल्याचा  ग्राहकांच्या दृष्टीने सुखद अनुभव आला. एका पंपावर पेट्रोल भरण्याची नळी पारदर्शक नव्हती. येथे बहुतेक ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक मीटरने आकडे नोंदवून पेट्रोल दिले जात होते.
थेट पेट्रोल भरताना काही ग्राहकांना 25 ते 4क्  पैशांचे कमी पेट्रोल दिले जाते. काही पंपांवर विशिष्ट रकमेचे पेट्रोल एका क्लिकवर भरले जाते काही ठिकाणी लिटरनुसार इंधन भरण्याची मागणी करणारांना सुटे 1 ते 4 रुपये देण्यास जवळ नसल्याचे   सांगितले जाते.  हजारो रुपयांचे डिङोल भरणा:या व्यावसायिक वाहनचालकांच्या बाबतीत असे प्रकार केले जात आहेत.  याकडे ब:याचदा दुर्लक्ष होते. (प्रतिनिधी)
 
‘पीयूसी’ काढून देणा:याची भूमिका संशयास्पद
4काही पंपावर पेट्रोल भरीत असतानाच पीयूसी काढून देणा:याकडून वाहनचालकास मध्येच हटकले जाते. दरम्यान कमी पेट्रोल भरले गेले अथवा पूर्वीचा आकडा शून्याहून अधिक असल्याचे निदर्शनास येऊ न देणो असे प्रकार घडत असल्याने पीयूसी काढणा:यांची ही भूमिकाच संशयास्पद ठरत आहे. त्यामुळे पीयूसी काढून देणा:यांसाठी पेट्रोल पंपाच्या विशिष्ट अंतराची मर्यादा घालून देणो तसेच त्यांनी पेट्रोल भरतेवेळी लक्ष विचलित करण्याची तक्रार आल्यास संबंधितांवर पंपचालकांनी कारवाई करणो गरजेचे आहे. वाहनचालकांना येथे सत्यासाठी झगडावे लागत आहे. 
 
शहरात पेट्रोल पंपावर कोणताही गैरप्रकार सुरू नाही. पूर्वी इटालियन बनावटीचे पेट्रोलपंप होते. त्या वेळी काही त्रुटी जाणवायच्या; मात्र आता सर्व पंप संगणकीकृत आहेत. इलेक्ट्रॉनिक प्रणालीनुसार रक्कम नोंदविल्याखेरीज पेट्रोल सुरूच होत नाही. आता कर्मचारीही प्रशिक्षित आहेत. पीयूसी काढून देणारांनी मुख्य पंपापासून ठरावीक अंतरावर थांबूनच आपले काम करावे. ग्राहकांनीही नुकसान होणार नाही याबाबत जागरूक राहिले पाहिजे. गैरप्रकाराची शंका वाटल्यास पेट्रोलपंप चालकाकडून हेल्पलाइन क्रमांक घेऊन त्वरित संपर्क साधावा.  तक्रारींचे निराकरण केले जाईल.
- बाबा धुमाळ, अध्यक्ष, पेट्रोल पंपचालक संघटना 

 

Web Title: Looters on petrol pumps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.