रोजगार बुडाल्याने तरुणांनी वाहनांमधून सुरू केले भाजीपाल्याचे दुकान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:12 AM2021-05-09T04:12:35+5:302021-05-09T04:12:35+5:30

अवसरी खुर्द, अवसरी बुद्रुक, गावडेवाडी, मेंगडेवाडी येथील सुशिक्षित मुले नोकरी-व्यवसायानिमित्त चाकण, खेड, मंचर, नारायणगाव आदी गावांत जात आहेत. कोरोनाचा ...

With the loss of employment, the youth started vegetable shops from their vehicles | रोजगार बुडाल्याने तरुणांनी वाहनांमधून सुरू केले भाजीपाल्याचे दुकान

रोजगार बुडाल्याने तरुणांनी वाहनांमधून सुरू केले भाजीपाल्याचे दुकान

Next

अवसरी खुर्द, अवसरी बुद्रुक, गावडेवाडी, मेंगडेवाडी येथील सुशिक्षित मुले नोकरी-व्यवसायानिमित्त चाकण, खेड, मंचर, नारायणगाव आदी गावांत जात आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने तसेच लॉकडाऊनमुळे अनेक तरुणांचे रोजगार बुडाल्याने शेतकऱ्यांच्या काही मुलांनी शेतात पिकविलेली मेथी, धना, टोमॅटो, वांगी, लसून, कांदा, मिरची चारचाकी पिकअप, ओमनी, स्विफ्ट गाडीमध्ये विकरण्यास सुरुवात केली. भाजीपाला भरून मंचर, अवसरी, गावडेवाडी, मेंगडेवाडी, पिंपळगाव येथील वाड्या-वस्त्यावर व गावातील रहिवाशांना विकत आहे. दररोज ताजा भाजीपाला घरपोच मिळत असल्याने महिलांना कोरोनाच्या संसर्गाच्या भीती मनात बाळगून बाजारात जाण्याची वेळ टाळता आली.

फोटो क्रमांक : ०८अवसरी भाजीपाला विक्री

फोटो : लॉकडाऊनमुळे रोजगार बुडाल्याने चारचाकी पिकअप, ओमनी, स्विफ्ट गाडीमध्ये भाजीपाला व्यवसाय करताना तरुण.

Web Title: With the loss of employment, the youth started vegetable shops from their vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.