भिगवण बाजारपेठेतील पर्स आणि बॅग दुकानाचे आगीत नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 12:37 AM2019-02-20T00:37:41+5:302019-02-20T00:37:53+5:30
भिगवण बाजारपेठेशेजारी असणाया गणेश मार्केट परिसरात ही घटना घडली. कुसुम लेदर या लेडीज पर्स पाकिटे आणि प्रवासी तसेच शाळेच्या बॅग असणाºया दुकानला पहाटेच्या सुमारास ही आग लागली.
भिगवण : भिगवण बाजारपेठेतील मध्यवस्तीत असणाऱ्या पर्स आणि बॅग दुकानाला पहाटे लागलेल्या आगीत दुकानदाराचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी फोन केल्यानंतर बारामती अॅग्रो साखर कारखान्याची फायर ब्रिगेडची गाडी आल्यानंतर आग आटोक्यात आली. मात्र तोपर्यंत दुकानातील संपूर्ण साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
भिगवण बाजारपेठेशेजारी असणाया गणेश मार्केट परिसरात ही घटना घडली. कुसुम लेदर या लेडीज पर्स पाकिटे आणि प्रवासी तसेच शाळेच्या बॅग असणाºया दुकानला पहाटेच्या सुमारास ही आग लागली. पोलीस पेट्रोलिंग तसेच गुरख्याच्या लक्षात पहिल्यांदा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी फोन करीत इतरांना याची माहिती दिली. तसेच या दुकानाचे मालक रोकडे यांना याची माहिती दिली.
रोकडे यांनी दुकानाचे शटर उघडेपर्यंत आगीने रौद्र रूप घेतले होते. तसेच याठिकाणी पिशव्या चिटकवण्यासाठी लागणारे लिक्विड असल्यामुळे त्याने लवकर पेट घेतला त्यामुळे कोणालाही आग विझविण्याची संधी मिळाली नाही. या आगीत दुकानदाराचे १० लाख रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तसेच यासाठी लागणारी संपूर्ण यंत्रणा आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या वेळी अनेक तरुणांनी बिल्ट कंपनीला आग विझविण्यासाठी अग्निशमनच्या गाडीसाठी फोन केला, मात्र कंपनीकडून गाडी नादुरुस्त असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी महेश ढवान यांनी बारामती अॅग्रो कारखान्याचे व्हाईस चेअरमन आबा गुळवे यांना फोन करून गाडी पाठविण्यास सांगितले. त्यानंतर अर्ध्या तासात ही गाडी आल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळाले.
गाडी काही वेळ आली नसती तर या दुकानाशेजारी असणाºया प्लायवूडच्या गोडावूनालाही आगीने वेढले असते. मात्र गाडी वेळेवर आल्याने पुढील प्रसंग टळला.
४भिगवणपासून पाच किलोमीटर अंतरावर असणारी बिल्ट कंपनी भिगवण परिसरात आग लागल्यावर कोणतेही सहकार्य करताना दिसून येत नाही. तर मग प्रत्येक वेळी गाडी नादुरुस्त सांगणारी कंपनी आपल्या परिसरात काही दुर्घटना घडल्यास काय उपाययोजना करते असा सवाल भिगवणकर विचारीत आहेत.