जास्त नोटा मिळवण्याच्या नादात ५ जणांचा घाटा, दीड कोटींचा गंडा

By भाग्यश्री गिलडा | Published: May 17, 2024 04:20 PM2024-05-17T16:20:03+5:302024-05-17T16:20:38+5:30

शहरातील पाच वेगवेगळ्या घटनांमध्ये एकूण दीड कोटींची फसवणूक झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत

Loss of 5 people, loss of one and a half crores in the name of getting more notes | जास्त नोटा मिळवण्याच्या नादात ५ जणांचा घाटा, दीड कोटींचा गंडा

जास्त नोटा मिळवण्याच्या नादात ५ जणांचा घाटा, दीड कोटींचा गंडा

पुणे: सायबर फसवणुकीमध्ये शहरातील पाच वेगवेगळ्या घटनांमध्ये एकूण दीड कोटींची फसवणूक झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. याप्रकरणी गुरुवारी (दि. १६) संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.

पहिल्या घटनेत, भवानी पेठेत राहणाऱ्या एका ५५ वर्षीय व्यक्तीने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शेअर ट्रेडिंगमध्ये नफा मिळवण्याचे आमिष दाखवून फिर्यादी आणि त्यांच्या बहिणीकडून एकूण १ कोटी २० लाख ६ हजार रुपये उकळले. त्यानंतर कोणताही परतावा न देता फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे हे करत आहेत.

दुसऱ्या घटनेत, गुलाबनगर परिसरात राहणाऱ्या एका ५१ वर्षीय व्यक्तीने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वेगवगेळे टास्क देऊन ते पूर्ण केल्यास चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखवले. सुरुवातीला मोबदला देऊन फिर्यादींचा विश्वास संपादन केला. फिर्यादींनी १३ लाख ५८ हजार रुपये भरल्यावर परतावा देण्यास बंद केल्याने आपली फसवणूक केल्याचे फिर्यादींच्या लक्षात आले. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक माळाळे हे करत आहेत.

तिसऱ्या घटनेत, हडपसर परिसरात राहणाऱ्या एका ३७ वर्षीय महिलेने हडपसर पोलिसांना फिर्याद दिली आहे. त्यानुसार सायबर चोरट्यांनी महिलेला संपर्क करून जुन्या नोटा विकून चांगले पॅसीए कमावता येतील असे सांगितले. त्यासाठी महिलेकडून ७ लाख ४१ हजार रुपये घेतले. मात्र कोणताही नफा न देता फसवणूक केली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मोढवे करत आहेत.

चौथ्या प्रकरणात, बाणेर परिसरात राहणाऱ्या एका २९ वर्षीय तरुणीने चतुःशृंगी पोलिसांना फिर्याद दिली आहे. प्रीपेड टास्क करण्यास सांगून तरुणीला ४ लाख ३३ हजार रुपये गुंतवण्यास भाग पाडून फसवणूक केली आहे. याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नांद्रे करत आहेत.

पाचव्या घटनेत, कोंढवा परिसरात राहणाऱ्या एका ३० वर्षीय व्यक्तीने पोलिसांना फिर्याद दिली आहे. सायबर चोरट्याने ३ लाखांचे लोन काढून ज्ञेयाच्या बहाण्याने प्रोसेसिंग फी च्या नावाखाली ८५ हजार ५०० रुपये घेऊन फसवणूक केली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक पाटील हे करत आहेत.

Web Title: Loss of 5 people, loss of one and a half crores in the name of getting more notes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.