देऊळगावराजे येथे वाळूमाफियांचे साठलाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:22 AM2021-09-02T04:22:32+5:302021-09-02T04:22:32+5:30
या परिसरात महसूल पथकाने अनेक वेळा वाळूमाफियांवर कारवाई करण्यात आली. कित्येक वाळूमाफियांवर दरोड्याचे गुन्हे दाखल केले. मात्र हे वाळूमाफिया ...
या परिसरात महसूल पथकाने अनेक वेळा वाळूमाफियांवर कारवाई करण्यात आली. कित्येक वाळूमाफियांवर दरोड्याचे गुन्हे दाखल केले. मात्र हे वाळूमाफिया कोणालाही न जुमनता वाळूउपसा सुरूच ठेवतात. भीमा नदी पात्रात महसूलची कुठलीच परवानगी नसताना वर्षानुवर्षे वाळूउपसा परिसरात सुरू असतो, मात्र कित्येक कारवाई झाल्या. परंतु वाळूउपसा बंद होत नाही.
कारवाईची चाहूल लागताच वाळूमाफियांनी धूम ठोकली. परंतु या पथकाने यांत्रिक फायबर बोटींना जिलेटिनच्या साहाय्याने उडवून दिल्या. साधारणपणे वाळूमाफियांचे अंदाजे साठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याने वाळूमाफियांची दाणादाण उडाली. या कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त होत आहे.
ही कारवाई पुणे पोलीस अधीक्षक डाॅ.अभिनव देशमुख, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहीते, दौंड विभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद घुगे व महसूल विभागातील कर्मचारी यांच्या पथकाने ही कारवाई केली.