खर्च वाचविण्याच्या नादात गमावले १९ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 01:11 AM2019-04-05T01:11:27+5:302019-04-05T01:11:37+5:30

विमा योजनेच्या नावाखाली महिलेला गंडा

Lost 19 lakhs of expenses | खर्च वाचविण्याच्या नादात गमावले १९ लाख

खर्च वाचविण्याच्या नादात गमावले १९ लाख

मुंबई : वयोवृद्ध वडिलांचा खर्च मार्गी लागावा म्हणून ठगांनी आरोग्य विम्याच्या नावाखाली सांगितलेल्या विविध योजनांत पेट्रोलियम कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापक महिलेने गुंतवणूक केली. खर्च वाचविण्याच्या नादात त्यांची तब्बल १९ लाख ६९ हजार रुपयांना फसवणूक केली. या प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करत, तपास सुरू केला आहे.

गोरेगाव येथील रहिवासी असलेल्या ६० वर्षीय तक्रारदार या नामांकित पेट्रोलियम कंपनीत वरिष्ठ साहाय्यक व्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत. २०१६ मध्ये वडिलांची प्रकृती खालावल्याने औषधोपचाराचा खर्च वाढला. वडिलांचा खर्च मार्गी लावण्याच्या विचारात असतानाच, एप्रिलमध्ये त्यांना विकास चव्हाण नावाच्या व्यक्तीचा फोन आला. त्याने तो एचडीएफसी लाइफ या कंपनीतून बोलत असल्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. साळवी यांनी वृद्ध वडिलांबाबत सांगून, मेडिक्लेम योजनेबाबत विचारणा केली. तेव्हा त्यांच्याकडील मेडिक्लेम योजनेतून वडिलांचा सर्व खर्च परत मिळेल, असे आश्वासन त्याने दिले. तसेच मोठ्या विमा योजनेत गुंतवणूक केल्यास कर्जही मिळण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार, त्यांनी सुरुवातीचे काही महिने ९६ हजार रुपये जमा केले.
पुढे त्यांनी योजनेचा लाभ कधी मिळणार याबाबत विचारताच, एका वर्षाच्या कालावधीत पैसे मिळतील, असे सांगितले. अशात सदर योजनेमुळे मोठी रक्कम मिळणार असल्याने त्यावर आयकर भरणे बंधनकारक राहणार असल्याची भीतीही दाखवली. आयकर वाचवायचा
असल्यास आणखी एक विमा योजना घेणे आवश्यक असल्याचे सांगून, आणखी एक योजना घेण्यास भाग पाडले. पुढे काही दिवसांनी
चव्हाणने नोकरी सोडल्याचे सांगून देविका नावाच्या तरुणीला पुढे
केले.
देविकानेही योजनेचे पैसे मिळवून देण्याच्या नावाखाली एप्रिलपर्यंत तब्बल १९ लाख ६९ हजार रुपयांची फसवणूक केली. अखेर यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, त्यांनी पोलिसांत धाव
घेतली. त्यानुसार, गोरेगाव
पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करत, तपास सुरू केला आहे.
 

Web Title: Lost 19 lakhs of expenses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.