वाहतूक पोलिसांमुळेच मिळाला हरवलेला मोबाइल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:11 AM2021-03-01T04:11:35+5:302021-03-01T04:11:35+5:30

वानवडी वाहतूक पोलीस शिपाई अश्विनी तिडके यांना तो मोबाइल सापडला होता. तिडके यांनी खातरजमा करून त्यांना तो परत केला. ...

The lost mobile was found only by the traffic police | वाहतूक पोलिसांमुळेच मिळाला हरवलेला मोबाइल

वाहतूक पोलिसांमुळेच मिळाला हरवलेला मोबाइल

Next

वानवडी वाहतूक पोलीस शिपाई अश्विनी तिडके यांना तो मोबाइल सापडला होता. तिडके यांनी खातरजमा करून त्यांना तो परत केला. वाहतूक पोलिसांमुळेच माझा हरवलेला मोबाइल मिळाला, असे अमोल ताटे यांनी सांगितले.

अमोल ताटे (वय ३३, रा. रामोशीआळी, हडपसर) यांचा मोबाइल फातिमानगर चौकातून सोपानबागेकडे जात होते. त्यावेळी त्यांच्या खिशातून महागडा मोबाइल पडला. घरी घेल्यानंतर मोबाइल हरवल्याचे लक्षात आले. महागडा मोबाइल हरवल्याने त्यांच्या घालमेल सुरू झाली. त्यांच्या पत्नीने काय झाले असता विचारल्यावर मोबाइल हरवल्याचे समजले. तातडीने मोबाइल फोन केला, तर मोबाइल वाहतूक पोलीस शिपाई अश्विनी तिडके यांच्याकडे सुरक्षित असल्याचे समजले. ताटे यांनी तातडीने फातिमानगर चौकात जाऊन तिडके यांच्याकडून मोबाइल घेऊन आभार मानले.

यावेळी ताटे म्हणाले की, चौकात वाहतूक पोलिसांमुळे मला माझा महागडा मोबाइल मिळाला. वाहतूक पोलीस फक्त दंड आकारत नाहीत, कागदपत्रे तपासत नाहीत, तर ज्येष्ठ नागरिक, अपंग, शाळकरी मुले यांना रस्ता ओलांडण्यासाठी मदत करतात. त्याचबरोबर फसवणूक झालेल्या व्यक्तीला वेळप्रसंगी स्वतःच्या खिशातील पैसे देऊन मदत करतात. रस्त्यात एखाद्याची वस्तू सापडली, तर ती संबंधितांपर्यंत सुखरूप पोहोचवितात, याचा प्रत्यय आल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: The lost mobile was found only by the traffic police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.