पहिल्या लाटेत भरघोस मदत, दुसऱ्या लाटेत ओघ ओसरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:11 AM2021-04-20T04:11:10+5:302021-04-20T04:11:10+5:30
मागच्या वर्षी लाॅकडाऊन जाहीर झाला त्यावेळी अनेक गरिबांपासून मध्यमवर्गीयांपर्यंतच्या लोकांनी व्यवसाय बंद ठेवून शिल्लक मोडून तर कुणी कर्ज काढून ...
मागच्या वर्षी लाॅकडाऊन जाहीर झाला त्यावेळी अनेक गरिबांपासून मध्यमवर्गीयांपर्यंतच्या लोकांनी व्यवसाय बंद ठेवून शिल्लक मोडून तर कुणी कर्ज काढून घरातील अडीनडीची कशीबशी मारून नेली. त्यानंतरकाही महिनेच उत्पन्नाचे स्त्रोत सुरु राहिले व पुन्हा ब्रेक द चेनचा लॉकडाऊन सुरु झाला. त्यामुळे पुन्हा उत्पन्नाचे स्त्रोत बंद पडले. गेल्यावर्षीच शिल्लक मोडल्यामुळे यंदा तीही संपली, कर्जही काढता येईना अशी अवस्था झाली असताना यंदा मदतीची आवश्यकता आणखी वाढली असताना मदतीचा ओघ मात्र आटला आहे.
महाराष्ट्र सरकारने गरिबांना शिवभोजन थाळी, स्वस्त दरात धान्य उलब्ध केले व काही व्यावसायिकांना प्रतिमहिना दीड हजारांचा मदत निधीही जाहीर केला. मात्र या तुटपुजंच्या मदतीनेमुळे गरीबांच्या जगण्याच्या अडचणी संपत नाहीयत सर्वसामान्य तर अक्षरश: भरडला जात आहे. त्यामुळे त्यांना मदतीची मोठी गरज निर्माण झाली आहे.
--
चौकट १
मदतीचा फार्स नको
--
एखाद्या नेत्याने आव्हान जर केले तरच गोरगरिबांना मदत करू आणि त्याचे फोटो काढून व्हायरल करण्याइतक्याच उद्देशाने काही स्वयंसेवी संस्था व कार्यकर्ते करताना दिसतात मात्र यंदा नेत्यांनीही कार्यकर्त्यांना आदेश दिले नाहीत त्यामुळे कार्यकर्त्यांकडूनही मदत लांब पण मदतीचा फार्सही केला नाही. मात्र हा फार्स सोडून मदत करणाऱ्या संस्थांनी पुढाकार घेण सध्या महत्वाच आहे, दान देताना तो घेणाऱ्यांपेक्षा देणाऱ्याला त्याचे अधिक सदिच्छारुपी लाभ होतात हे लक्षात घेऊन उदात्त हेतूने धनवंतांनी पुढे येणे गरजेचे झाले आहे.