महिलांसाठी उद्योजकतेच्या भरपूर संधी :तेजस्विनी वेंकटेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:11 AM2021-03-10T04:11:39+5:302021-03-10T04:11:39+5:30
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जयहिंद कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कुरण मध्ये उद्योजकता विकास जागृकता या विषयावर खास मुलींसाठी राष्ट्रीय ...
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जयहिंद कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कुरण मध्ये उद्योजकता विकास जागृकता या विषयावर खास मुलींसाठी राष्ट्रीय स्तरावरचे वेबिनार आयोजित करण्यात आले होते. ऑनलाईन पध्दतीने आयोजित करण्यात आलेल्या या वेबीनारमध्ये त्या बोलत होत्या.
तेजस्विनी वेंकटेश म्हणाल्या कि , नवीन उद्योग सुरू करायचा असेल किंवा सध्या सुरू असलेल्या उद्योगामध्ये बदल करावयाचे असतील तर प्रामुख्याने आपल्याला आवश्यक तंत्रज्ञान उपलब्ध असणे गरजेचे आहे. .
या ऑनलाईन कार्यक्रमामध्ये जयहिंद शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष जितेंद्र गुंजाळ, सचिव विजय गुंजाळ, संचालिका सौ. शुभांगी गुंजाळ प्राचार्य डॉ. डी. जे. गरकल, डॉ. व्हि. एम. धेडे उपस्थित होते त्यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. परिसरातील महाविद्यालयीन विद्यार्थिनी आणि प्राध्यापिकांनी या वेबीनारमध्ये ऑनलाईन सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रा. स्वाती जाधव यांनी प्रयत्न केले.