पुण्यातील म्हाडाच्या घरांची उद्या हाेणार साेडत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 07:22 PM2019-11-18T19:22:05+5:302019-11-18T19:23:57+5:30
म्हाडाच्या पुण्यातील 2 हजार 190 सदनिकांची उद्या ऑनलाईन पद्धतीने साेडत हाेणार आहे.
पुणे : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) च्या पुणे विभागातील घरांची साेडत उद्या दि. 19 नाेव्हेंबर राेजी हाेणार आहे. यात विविध ठिकाणी बांधण्यात आलेल्या एकूण 2 हजार 190 सदनिकांची ऑनलाईन साेडत हाेणार असल्याचे म्हाडाचे मुख्य अधिकारी अशाेक पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
म्हाडातर्फे सर्वसामान्यांच्या बजेटला परवडतील अशी घरे बांधण्यात येतात. म्हाडाच्या याेजनांद्वारे सर्वसामान्यांना आपल्या स्वप्नातील घर घेणे शक्य हाेत असते. विविध शहरांमध्ये म्हाडाद्वारे गृहप्रकल्प उभारण्यात येत असतात. त्यांची साेडत ऑनलाईन पद्धतीने हाेत असते. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकांच्या हद्दीतील सर्वसमावेशक गृहनिर्माण, प्रधानमंत्री आवास याेजना व म्हाडाच्या गृहनिर्माण याेजनेअंतर्गत विविध ठिकाणी बांधण्यात आलेल्या एकूण 2 हजार 190 सदनिकांची ऑनलाईन साेडत उद्या हाेणार आहे.
उद्या सकाळी 10 वाजता कॅम्प भागातील नेहरु मेमाेरियल हाॅल या ठिकाणी ही साेडत हाेणार आहेत.