MHADA | पुण्यातील घराचे स्वप्न होणार पूर्ण! म्हाडाच्या ५ हजार घरांची सोडत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2022 12:31 PM2022-06-04T12:31:23+5:302022-06-04T12:35:11+5:30
पुढील आठवड्यात होणार सोडत...
पुणे :म्हाडाच्यापुणे विभागाने पुणे, पिंपरी चिंचवडसह सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल ४९३५ घरांची सोडत काढण्याचे ठरवले असल्याची माहिती गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे मुख्य अधिकारी नितीन माने पाटील यांनी सांगितले. यात पुण्यातील ५७५ घरांचा समावेश आहे. तर पिंपरीत १५२७ सदनिका असतील. पुढील आठवड्यात ही सोडत काढण्यात येणार आहे.
या ४९६५ सदनिकांमध्ये म्हाडाच्या योजनेतील २८६३ सदनिका व वीस टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील २१०२ सदनिका असतील. उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील, प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर आदींच्या उपस्थितीत पुढील आठवड्यात ही सोडत होणार असल्याचे माने यांनी सांगितले.
वीस टक्के सर्व समावेश गृृहनिर्माण योजनेतील पुणे महापालिकेमध्ये ५७५ घरांचा समावेश आहे. पिंपरी चिंचवड महापालिका १५२७ सदनिका उपलब्ध असणार आहेत. तर म्हाडा गृहनिर्माण योजनेंतर्गत प्रथम येणाऱ्यास प्राधान्य यानुसार २८६३ सदनिका आहेत. पुणे विभागाच्या म्हाडाची गेल्या काही वर्षांतील ही अकरावी सोडत आहे.