प्रेमप्रकरणातून प्रियकराने केली प्रेयसीसमोरच आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2022 09:26 PM2022-10-16T21:26:58+5:302022-10-16T21:29:04+5:30

आपले तीन वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. आपल्या दोघांना लग्न करायचे होते. तुझं दुसऱ्याशी लग्न जमलं आहे आता माझा जगून काय उपयोग?

Lover commits suicide in front of girlfriend due to love affair | प्रेमप्रकरणातून प्रियकराने केली प्रेयसीसमोरच आत्महत्या

प्रेमप्रकरणातून प्रियकराने केली प्रेयसीसमोरच आत्महत्या

Next

धायरी:

आपले तीन वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. आपल्या दोघांना लग्न करायचे होते. तुझं दुसऱ्याशी लग्न जमलं आहे आता माझा जगून काय उपयोग? असे म्हणत प्रेयसीसमोरच तिच्या ओढणीने गळफास घेत प्रियकराने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. साकीब लतीफ इनामदार (वय २५, रा. माऊली नगर,दिघी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. हि घटना सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या गोळेवाडी येथील किनारा लॉज येथे रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साकीब इनामदार व त्याची प्रेयसी यांचे मागील तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. तरुणी दुसऱ्या धर्मातील असून तिचे काही दिवसांपूर्वी लग्न जमले आहे. रविवारी सकाळी अकरा वाजता दोघेही गोळेवाडी येथील किनारा लॉजवर आले. तेथे दोघांमध्ये लग्नावरुन शाब्दिक वादावादी झाली. त्यावेळी तरुणाने आता तुझे दुसऱ्याशी लग्न जमले आहे मी तरी जगून काय करु? असे म्हणत तिच्या ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. याबाबत हॉटेल मालकाने तात्काळ या घटनेची माहिती हवेली पोलिसांना दिली. यानंतर पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निरंजन रणवरे, पोलीस हवालदार विलास प्रधान, पोलीस नाईक गणेश धनवे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. याबाबत हवेली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अन् ओढणीची गाठ लवकर सुटली नाही...
खासगी कंपनीत काम करणारा साकीब इनामदार हा पिंपरी भागात राहत होता. तर त्याची प्रेयसीही त्याच भागात राहते. प्रेयसीचे लग्न जमल्याने तो तणावात होता. रविवारी भेटण्यासाठी ते हवेली पोलीस ठाणे हद्दीतील डोणजे येथील एका लॉजमध्ये आले. दरम्यान त्यांच्यात लग्नाच्या कारणावरून वाद सुरू असताना साकीबने ओढणीच्या साहाय्याने गळफास घेण्याचा प्रयत्न केला. प्रेयसीने त्याला अडवण्याचा प्रयत्न करीत असताना त्याच्या गळ्यातील ओढणीची गाठ काही सुटेना. तिने खाली जाऊन काउंटरवरून ओढणी कापण्यासाठी कात्री घेऊन येईपर्यंत त्याचा गळफास लागून मृत्यू झाला.

Web Title: Lover commits suicide in front of girlfriend due to love affair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.