प्रियकराचा प्रेयसीनेच नवऱ्याच्या मदतीने केला खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:07 AM2021-04-29T04:07:46+5:302021-04-29T04:07:46+5:30

मयत महेश लोहकरे यांचे भरत भोरू ढोंगे (रा. आव्हाड, ता. खेड) यांच्या पत्नीबरोबर पूर्वीपासून प्रेमसंबध होते. ढोंगेबरोबर लग्न झाले ...

The lover's lover committed the murder with the help of her husband | प्रियकराचा प्रेयसीनेच नवऱ्याच्या मदतीने केला खून

प्रियकराचा प्रेयसीनेच नवऱ्याच्या मदतीने केला खून

Next

मयत महेश लोहकरे यांचे भरत भोरू ढोंगे (रा. आव्हाड, ता. खेड) यांच्या पत्नीबरोबर पूर्वीपासून प्रेमसंबध होते. ढोंगेबरोबर लग्न झाले तरी लोहकरे यांचे ढोंगे यांच्या पत्नीकडे व घराकडे येणे-जाणे सुरूच होते. या दोघांचे काहीतरी प्रेमप्रकरण सुरू यांचा संशय भरत ढोंगे याला आला होता. ढोंगे याने पत्नीला विश्वासात घेऊन हा प्रकार थांबव, असे सांगितले होते. या कारणावरून पति-पत्नीत भांडणे झाली होती. तसेच लोहकरे याला दोन वेळा ढोंगे यांने मारहाण केली होती. लोहकरे यांचा काटा काढण्याचा प्लॅन ढोंगे याने पत्नीला विश्वासात घेऊन रचला होता. दि. ३ एप्रिल रोजी मयत लोहकरे हा महाराष्ट्र बँकेचे एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेला असता, भरत भोरू ढोंगे याने त्याची बायको पुष्पा हिच्याबरोबर महेश लोहकरे याचे अनैतिक संबंध आहेत, अशा संशयावरून त्यास मोटारसायकलवर बसवून घेऊन जाऊन त्याचा घातपात केला असावा. अशी फिर्याद दि. ६ एप्रिल रोजी खेड पोलीस ठाण्यात मुलांची आई वंदना वसंत लोहकरे यांनी फिर्याद दिली होती.

या फिर्यादीवरून खेड उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लंबाते, पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अंकुश मिसाळ, योगेश भंडारे यांनी तपास सुरू केला. ढोंगे यांची पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेऊन उलट तपासणी केली असता, ती घाबरलेली आढळून आली. पोलिसांना संशय येताच पती ढोंगे याला ताब्यात घेऊन चौकशी केली. पोलिसांनी ढोंगे याला सांगितले. तुझ्या पत्नीने सर्व काही खरे सांगितले आहे. आम्हाला तू लवकर सांग काय खरे ते खोटे. असा पोलिसी खाक्या दाखवून लोहकरे यांचा खून केल्याची कबुली दिली. लोहकरे याला राजगुरुनगर बसस्थानकसमोर माझ्या पत्नीने एका रूममध्ये कोडून घेतले. दरम्यान मला फोन करून सांगितले. मी व पत्नीचा भाऊ व एका मित्राच्या मदतीने लोहकरे याला मारहाण केली. तसेच त्याला गाडीत बसवून पत्नीच्या आई-वडिलासमोर माफी माग असे सांगून आंबेगाव तालुक्यातील घनदाट जंगलात नेऊन लोहकरे याला झाडाला फाशी दिली. त्याचा मृतदेह गोहे (ता. आंबेगाव ) येथे आरोपीच्या घरापासून ३ किलोमीटर अंतरावर जमिनीत पुरला. पोलिसांनी ढोंगे व त्यांची पत्नी यांना अटक केली आहे. पुढील तपास खेड पोलीस करीत आहे.

Web Title: The lover's lover committed the murder with the help of her husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.