बारामती शहरातील उद्यानांमध्ये प्रेमी युगुलांचे चाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 11:16 PM2018-08-29T23:16:25+5:302018-08-29T23:16:41+5:30

पोलिसांचे दुर्लक्ष : सुरक्षारक्षक झाडाखाली निवांत

Lover's twins in the parks of Baramati city | बारामती शहरातील उद्यानांमध्ये प्रेमी युगुलांचे चाळे

बारामती शहरातील उद्यानांमध्ये प्रेमी युगुलांचे चाळे

googlenewsNext

बारामती : झारगडवाडी येथील अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येनंतर पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले आहे. महाविद्यालय, रस्ते अशा ठिकठिकाणी निर्भया पथक कारवाई करीत आहे. मात्र, शहरातील बागांमध्ये सुरू असणाऱ्या प्रेमी युगुलांच्या अश्लील चाळ्यांकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे.

बारामतीमधील शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाºया पूनावला उद्यानामध्ये भरदिवसा दिसणारे हे चित्र आहे. जोडप्यांचे अश्लील चाळे सुरू असताना नगरपालिकेचे सुरक्षारक्षक निवांत झाडाखाली बसलेले असतात व या जोडप्यांकडे काणाडोळा करतात. पोलिसांना याबाबत कळविणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. भिगवण चौकातील गजबजलेल्या ठिकाणी पूनावाला उद्यान आहे. त्याचे प्रवेशद्वार अनेकदा दिवसभर उघडे असते. त्यामुळे बागेत लव्हबर्डचा हा अड्डा झाला आहे. बागेतील बाकड्यावर हे निवांत तासन् तास बसून असतात. या बाकड्यांवर बसूनच प्रेमी युगुलांचे चाळे सुरूअसतात. सुरक्षारक्षकदेखील त्यांना हटकत नाहीत; त्यामुळे या जोडप्यांचे चांगलेच फावते. ते कोणाची पर्वा न करता येथे बसतात. संध्याकाळी महिला लहान मुलांना खेळण्यासाठी बागेत घेऊन येतात. त्याचप्रमाणे वयस्कर लोक व महिला येथे चालण्याचा व्यायाम करायला येतात. या जोडप्यांच्या चाळ्यांमुळे येथे येणाºयांना मानसिक त्रास होतो. त्याचप्रमाणे टी. सी. कॉलेजकडे जाणाºया रस्त्यावरदेखील बाग बनवली आहे. तेथे बसण्यासाठी बाकडे टाकले आहे. येथेही चित्र
वेगळे नाही.

नियमांचे उल्लंघन करणाºयांवर कारवाई : शिरगावकर
दहीहंडी उत्सव मंडळांनी न्यायालयाने ध्वनिप्रदूषणाबाबत घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करा. नियमांचे उल्लंघन करणाºया मंडळांवर कारवाई केली जाईल, असा इशारा उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिला.
४शहर पोलीस ठाण्यात बारामतीतील दहीहंडी उत्सव मंडळांच्या पदाधिकाºयांच्या बैठकीत ते बोलत होते. शिरगावकर म्हणाले, की दहीहंडी उत्सवात किती थर लावावेत, यासंबंधी मर्यादा आहेत, त्याचे पालन मंडळांनी केले पाहिजे. दहीहंडीमध्ये अल्पवयीन मुलांचा वापर होऊ देऊ नये. थर लावताना अल्पवयीन मुलांना स्थान दिले तर मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागण्याची शक्यता असते. साऊंड सिस्टीमचा वापर टाळावा. ध्वनिप्रदूषणाबाबत न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे. उत्सवाला होणारी गर्दी लक्षात घेता मंडळांनी आपले स्वयंसेवकही नेमावेत.

पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ म्हणाले, की स्वयंशिस्तीने उत्सवाचा आनंद द्विगुणित होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक मंडळाने, त्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी स्वयंशिस्तीचे दर्शन उत्सवाच्या माध्यमातून घडवावे. पोलीस नाईक ओंकार सिताप यांनी यावेळी शहरात ३३ नोंदणीकृत मंडळे असल्याचे सांगून उत्सवासाठी मंडळांनी आवश्यक त्या परवानग्या घ्याव्यात, असे आवाहन केले. या वेळी उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे, निरीक्षक धुमाळ आदी उपस्थित होते.
 

Web Title: Lover's twins in the parks of Baramati city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.