पुण्यातील पाषाण टेकडीवर प्रेमयुगलांना लाथाबुक्क्यांनी मारहाण; फोन पेमधून ७६ हजारही लुबाडले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2022 05:52 PM2022-03-20T17:52:12+5:302022-03-20T17:52:21+5:30

पाषाण येथील टेकडीवर फिरायला आलेल्या युगलाला तिघा चोरट्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन फोन पे खात्यामधून जबरदस्तीने ७६ हजार रुपये ट्रान्सफर करुन घेऊन लुबाडले

Loving couples beaten on a rocky hill in Pune 76,000 were stolen from the phone | पुण्यातील पाषाण टेकडीवर प्रेमयुगलांना लाथाबुक्क्यांनी मारहाण; फोन पेमधून ७६ हजारही लुबाडले

पुण्यातील पाषाण टेकडीवर प्रेमयुगलांना लाथाबुक्क्यांनी मारहाण; फोन पेमधून ७६ हजारही लुबाडले

Next

पुणे : पाषाण येथील टेकडीवर फिरायला आलेल्या युगलाला तिघा चोरट्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन फोन पे खात्यामधून जबरदस्तीने ७६ हजार रुपये ट्रान्सफर करुन घेऊन लुबाडले. ही घटना पाषाण येथील टेकडीवरील सुसखिंडीत शुक्रवारी रात्री सव्वा आठ वाजता घडली.

गेल्या वर्षीही डिसेंबरमध्ये मैत्रिणीबरोबर सुस खिंडतील टेकडीवर फिरायला आलेल्या चिंचवडमधील ३४ वर्षाच्या तरुणाला तिघांनी मारहाण करुन दोघांकडील १ लाख रुपयांचा ऐवज लुटून नेला होता. तर एप्रिल २०१९ मध्ये एका तरुणाला तोतया पोलिसांनी मारहाण करुन लुबाडले होते. त्यानंतर या परिसरातील ही तिसरी घटना आहे. याप्रकरणी पिंपरीतील नेहरुनगर येथील एका २५ वर्षाच्या तरुणाने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांची मैत्रिण हे पाषाण टेकडीवर फिरुन एके ठिकाणी बसले होते. त्यावेळी तिघे जण तेथे आले. त्यांनी तुम्ही कोठले, इथै काय करता, असे म्हणून त्यांना मारहाण केली. दमदाटी करुन जीव मारण्याची धमकी देऊन त्यांच्या मोबाईलवरुन ४० हजार रुपये व मैत्रिणीच्या मोबाईलमधील फोन पेवरुन त्यांच्या मोबाईलवर ३६ हजार रुपये असे एकूण ७६ हजार रुपये जबरदस्तीने ट्रान्सफर करुन घेऊन पळून गेले. याबाबत पोलीस उपनिरीक्षक कपील भालेराव अधिक तपास करीत आहेत. 

Web Title: Loving couples beaten on a rocky hill in Pune 76,000 were stolen from the phone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.