राज्यांतर्गत अल्प प्रतिसाद, उत्तरेकडे मात्र ‘वेटिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:07 AM2021-05-03T04:07:21+5:302021-05-03T04:07:21+5:30

पुणे : राज्यांतर्गत रेल्वे प्रवासाकडे प्रवाशांनी पाठ फिरवली आहे.तर दुसरीकडे उत्तर भारतात जाणाऱ्या गाड्यानं अजूनही ‘वेटिंग’ सुरू आहे. विशेषतः ...

Low response within the state, but 'waiting' in the north | राज्यांतर्गत अल्प प्रतिसाद, उत्तरेकडे मात्र ‘वेटिंग’

राज्यांतर्गत अल्प प्रतिसाद, उत्तरेकडे मात्र ‘वेटिंग’

Next

पुणे : राज्यांतर्गत रेल्वे प्रवासाकडे प्रवाशांनी पाठ फिरवली आहे.तर दुसरीकडे उत्तर भारतात जाणाऱ्या गाड्यानं अजूनही ‘वेटिंग’ सुरू आहे. विशेषतः पुणे दानापूर, गोरखपूर, आदी गाड्याना प्रवाशांची गर्दी होत आहे. पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या गाड्यांना सर्वात कमी प्रतिसाद लाभत आहे.

राज्यांत ब्रेक द चेन अंतर्गत कडक निर्बंध सुरू झल्यापासून उत्तरेकडे जाणाऱ्या गाड्यांना प्रवाशांची गर्दी होत आहे. ती आजही कायम आहे. परप्रांतीय मजूर अजूनही पुणे सोडून जात आहे. हेच यावरून स्पष्ट होते. रेल्वेने वाढती गर्दी लक्षात घेऊन एप्रिल महिन्यात जवळपास ३० हुन अधिक अतिरिक्त रेल्वे उत्तर भारतात जाण्यासाठी सोडल्या.अजूनही गाडया सोडण्याचे प्रमाण कायम आहे.

चौकट

राज्यांत धावणाऱ्या गाड्यांना प्रतिसाद नाही

पुणे-मुंबई डेक्कन क्वीन एक्सप्रेस ८.५१%

कोल्हापूर-तिरुपती १६ %

पुणे-नांदेड २२.७०%

तर पुणे-नागपूर, पुणे-अजनी, पुणे-नागपूर हमसफर एक्सप्रेस, पुणे-अजनी एसी एक्सप्रेस आदी गाड्या कमी प्रतिसाद मुळे रद्द केल्या आहेत.

चौकट

या गाड्यांना अधिक प्रतिसाद

पुणे-दानापूर १३०%

पुणे-हावडा १२३ %

पुणे-गोरखपूर १२० %

पुणे-दरभंगा ११६ %

पुणे-लखनऊ १०३%

पुणे-सतरंगची ९६%

कोट

गाड्यांच्या प्रवासी संख्येवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. ज्या गाड्यांना गर्दी अधिक होत आहे. त्या मार्गावर अतिरिक्त गाड्या सोडण्यात येत आहे.

- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, पुणे

Web Title: Low response within the state, but 'waiting' in the north

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.