जळगावात सर्वांत कमी ७ अंश सेल्सिअस तापमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:11 AM2021-02-10T04:11:48+5:302021-02-10T04:11:48+5:30
पुणे : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात किमान तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. जळगाव येथे सर्वांत कमी किमान तापमान ७ अंश ...
पुणे : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात किमान तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. जळगाव येथे सर्वांत कमी किमान तापमान ७ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. ते सरासरीच्या तुलनेत ५.८ अंशाने घटले आहे. नाशिक, पुणे, बारामती येथे या हंगामातील सर्वांत कमी तापमानाची मंगळवारी सकाळी नोंद झाली आहे.
राज्यातील अनेक शहरामधील किमान तापमान सिंगल डिजिटपर्यंत खाली घसरले आहेत. मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या तुरळक भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे. मराठवाड्यातील परभणीत किमान तापमान सरासरीपेक्षा ५.९ अंशाने घसरले आहे. तापमानातील ही घट आणखी एक दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान : जळगाव ७, सातारा १०.७, नाशिक ९.१, बारामती ८.८, पुणे ८.६, महाबळेश्वर १२.७, सांगली १३.९, जेऊर ९, मालेगाव १०.४, सांताक्रुझ १७.६, डहाणू १७.१, ठाणे २०.२, औरंगाबाद १०.७, जालना १४, परभणी ९.९, उस्मानाबाद १२.४, नांदेड १०.७, अकोला १०.५, अमरावती१०.४, बुलढाणा ११.८, ब्रम्हपुरी १०.८, चंद्रपूर ११.४, गडचिरोली १०, गाेंदिया ९.६, नागपूर १०.६, वाशिम १०.४, वर्धा ११, यवतमाळ १०.
--
पुणेकरांसाठी ९ फेब्रुवारीचा असाही योगायोग
पुणे : पुणेकरांना गेल्या काही वर्षांमध्ये ९ फेबुवारी हा दिवस खास ठरू लागला आहे. गेल्या १० वर्षांपैकी निम्म्या म्हणजे ५ वर्षात फेब्रुवारीमधील सर्वांत कमी किमान तापमान हे ९ फेब्रुवारी रोजी नोंदविले गेल्याचे दिसून येत आहे़
आज ९ फेब्रुवारी २१ रोजी पुण्यात आतापर्यंतचा सर्वात कमी ८़.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे़ गेल्या १० वर्षातील फेब्रुवारीतील सर्वांत कमी ९ फेब्रुवारी २०१२ रोजी ४.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली होती़.
९ फेब्रुवारी २०१९ रोजी ५.१
९ फेब्रुवारी २०१६ रोजी ८.७
९ फेब्रुवारी २०१५ रोजी ९.८