पुण्यात राज्यातील सर्वाधिक गारवा; दिवसा उकाडा, रात्री थंडी, एकाच दिवसात दोन ऋतूंचा अनुभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 01:53 PM2018-02-13T13:53:04+5:302018-02-13T13:58:15+5:30
पुणे शहरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून किमान तापमानात घट होत होती़ रविवारी १३.३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते़ त्यात सोमवारी आणखी घट होऊन राज्यातील सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली.
पुणे : पुणे शहरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून किमान तापमानात घट होत होती़ रविवारी १३.३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते़ त्यात सोमवारी आणखी घट होऊन राज्यातील सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली़ त्याच वेळी दिवसाचे कमाल तापमान ३१.८ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले असल्याने दिवसा उकाडा, तर सायंकाळनंतर गारवा अशा दोन ऋतूंचा अनुभव एकाच दिवसात पुणेकरांना येत आहे़
किमान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़ विदर्भ-मराठवाड्यातील काही भागात सलग दुसऱ्या दिवशी गारपिटीचा तडाखा बसला असून मंगळवारीही विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़ राज्यात सर्वांत कमी किमान तापमान पुणे येथे ११़६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.