६०० किमी अंतर पायी आलेल्या शेतकऱ्याची निष्ठा सफल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:38 AM2020-12-17T04:38:06+5:302020-12-17T04:38:06+5:30
निष्ठेचा सन्मान केला. हाच सन्मान आज दिवसभर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला. संजय खंदार देशमुख (रा.जवळा,ता.अरणी,जि.यवतमाळ) असे या ज्येष्ठ ...
निष्ठेचा सन्मान केला. हाच सन्मान आज दिवसभर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला.
संजय खंदार देशमुख (रा.जवळा,ता.अरणी,जि.यवतमाळ) असे या ज्येष्ठ शेतकऱ्याचे नाव आहे. डॉ. पंजाबराव देशमुख यांचे हे गाव आहे. देशमुख यांच्यानंतर बळी राजाचा साठी महत्वाचे निर्णय शरद पवार यांनीच घेतले.त्यांनी घेतलेल्या कर्जमाफीच्या निर्णयामुळे देशमुख यांच्या जीवनात मोठा सकारात्मक बदल झाला.त्यामुळे पवार यांच्याविषयी शेतकरी देशमुख यांच्या मनात अढळ स्थान
निर्माण झाले.त्यामुळे यंदाच्या वाढदिवशी शरद पवारांना भेटायचच, हे मनाशी पक्क ठरवून ते जवळा गावातून थेट चालत बारामतीच्या दिशेने निघाले. तीव्र इच्छाशक्तीमुळे वयाच्या ५४ व्या वर्षी देशमुख हे तब्बल ११ दिवस जवळपास ६३० कि.मी.चे अंतर चालून ११ डिसेंबरला बारामतीत पोहोचले. या दिवशी पवार यांच्या गोविंदबाग निवासस्थानी उपस्थित नव्हते.त्यामुळे शेतकरी देशमुख पवारांच्या मूळ गावी काटेवाडीत पोहचले.गावकरी देशमुख यांची निष्ठा पाहुन भारावले.त्यांनी देशमुख यांचा मोठा सन्मान केला.यावेळी
शेतकरी देशमुख यांची पवार यांची भेट घेण्याची तीव्र इच्छा काटेवाडी येथे वास्तव्यास असणारे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कोषाध्यक्ष अमोल काटे यांना सांगितली. त्यानंतर काटे यांनी थेट पवार यांच्याशी संपर्क साधत याबाबत माहिती दिली. पवार यांनी देखील शेतकरी देशमुख यांच्या निष्ठेचा मान राखत भेटीची वेळ दिली.पवार यांचे स्वीय सहायक सतीश राऊत यांनी काटे यांना संपर्क साधत पुणे शहरातील मोदी बागेतील निवासस्थानी वेळ दिल्याचे सांगितले.
त्यानंतर संभाजी ब्रिगेडचे प्रदेष कोषाध्यक्ष प्रविण गायकवाड,काटे शेतकरी देशमुख यांना घेवुन मोदीबागेतील पवारांच्या निवासस्थानी मंगळवारी(दि १५) पोहचले. यावेळी पवार यांनी शेतकरी देशमुख यांना तब्बल दीड तासांचा वेळ दिला. त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. पवार यांच्या भेटीने भारावलेल्या देशमुखांच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहिले. या भेटीने आयुष्याचे सार्थक झाले. घरात एक पांडुरंगाचा आणि दुसरा पवारसाहेबांचा फोटो आहे, असे सांगत त्यांनी त्यांची पवारांवरील निष्ठा अधोरेखित केली.पवार यांनी देखील त्यांच्या निष्ठेचा सन्मान केल्याने देशमुखांची ६०० किमीचा प्रवास खºया अर्थाने सार्थक ठरला.
————————————————
यवतमाळ जिल्ह्यातून ६०० किमी पायी चालत आलेले शेतकरी संजय देशमुख यांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुण्यातील निवासस्थानी भेटीसाठी वेळ दिली.
१६बारामती