मी नशीबवान..! पडलो तरी आमदार, सभापती झालो - राम शिंदेंचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 15:28 IST2025-02-03T15:27:37+5:302025-02-03T15:28:15+5:30

ज्या पदावर जातो त्या पदासाठी आपण कशा पद्धतीचे योगदान देतो हे महत्त्वाचे

Lucky me! Even if I fell, I became MLA, Speaker - Ram Shinde's statement | मी नशीबवान..! पडलो तरी आमदार, सभापती झालो - राम शिंदेंचे वक्तव्य

मी नशीबवान..! पडलो तरी आमदार, सभापती झालो - राम शिंदेंचे वक्तव्य

इंदापूर : जनता जनार्दनाचे आशीर्वाद व भाजपच्या पाठबळामुळे विधान परिषदेचे सभापती या नात्याने माझ्या राजकीय जीवनाच्या सर्वोच्च पदावर गेलो आहे. आपण ज्या पदावर जातो त्या पदासाठी आपण कशा पद्धतीचे योगदान देतो हे महत्त्वाचे आहे, असे मत विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यानी व्यक्त केले.

विधान परिषदेच्या सभापती पदावर प्रा. राम शिंदे यांची निवड झाल्याबद्दल इंदापूरकरांच्या वतीने त्यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. सत्कारास उत्तर देताना ते बोलत होते. क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. इंदापूर येथील राधिका रेसिडेन्सी हॉलमध्ये सत्कार झाला. प्रा. राम शिंदे म्हणाले की, विधान परिषद हे वरिष्ठ व ज्येष्ठांचे सभागृह आहे. माझ्या एवढ्या तरुण माणसाला पहिल्यांदा सभापती पद मिळाले आहे. कार्यकाळ संपण्यास एक दिवस कमी असताना हे पद माझ्याकडे आले. मी तर भाजपचा नसतो तर सभापती झालो असता का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. निवडून आलेल्या २४० मधील ४२ मंत्री आहेत. १९८ आमदार आहेत व मी सभापती आहे. लोक म्हणतात राम शिंदे नशीबवान आहेत.

मी तर नशीबवान आहेच, पडलो तर आमदार झालो दुसऱ्यांदा सभापती झालो, असे ते म्हणाले. क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, जी माणसं खडतर प्रवास करतात त्यांचे यश मोठे असते. प्रा. शिंदे कष्टाची सवय असणारे भाजपचे फार मोठे नेते आहेत. भाजपने त्यांना खूप मोठे पद दिले आहे. या पदाचा उपयोग ते निश्चितपणे जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी करतील. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष माउली चवरे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. शशिकांत तरंगे, माउली वाघमोडे, शिवाजीराव मखरे, तेजस देवकाते यांची भाषणे झाली. किरण गानबोटे यांनी आभार मानले. 

Web Title: Lucky me! Even if I fell, I became MLA, Speaker - Ram Shinde's statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.