लम्पीचे कोविडप्रमाणेच म्युटेशन; संसर्गाचा वेग वाढला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 10:27 AM2022-09-21T10:27:31+5:302022-09-21T10:28:10+5:30

संसर्गाचा वेग वाढला, अंतर्गत अवयवांवरही हल्ला, जिनाेम सिक्वेन्सिंगमधून माहिती

Lumpy's covid-like mutation; The rate of infection increased | लम्पीचे कोविडप्रमाणेच म्युटेशन; संसर्गाचा वेग वाढला

लम्पीचे कोविडप्रमाणेच म्युटेशन; संसर्गाचा वेग वाढला

Next

ज्ञानेश्वर भोंडे

पुणे : राज्यात १० हजारांहून अधिक गुरांना बाधित करणारा लम्पी व्हायरस हा २०२० मधील मूळ विषाणूच्या तुलनेत बदललेला आहे. त्याचा संसर्गाचा वेग अधिक आहे. बाधित गुरांच्या त्वचेवर फाेड येऊन त्याची लक्षणे दिसून येत हाेती. आता बाधित गुरांच्या आतील फुप्फुस, यकृत, आतडे यांवही हल्ला करून त्यांना निकामी करत असल्याचे जिनाेम सिक्वेन्सिंगमधून आढळून आले आहे.

मृत्यू गुरांच्या पाेस्टमार्टममध्ये त्यांच्या आतील अवयवांमध्येही गाठी दिसून येत आहेत, अशी माहिती राज्याचे पशुसंर्वधन विभागाचे उपायुक्त देवेंद्र जाधव यांनी ‘लाेकमत’ला दिली. अस्तित्व टिकविण्यासाठी विषाणू सातत्याने बदल म्हणजेच म्युटेशन करत असताे. काेविडमध्येही सातत्याने म्युटेशन हाेत हाेते. राजस्थानमध्ये शास्त्रज्ञांना जिनाेम सिक्वेन्सिंग केले असता, ही बाब समाेर आली आहे. याचा शाेधनिबंध प्रसिद्ध झाला आहे.

२७ जिल्ह्यांत साथ पसरली असून १७ जिल्ह्यांत मृत्यू असे

जळगाव ९४, अकोला ४६, अहमदनगर ३०, धुळे ९, पुणे २२, लातूर ३, औरंगाबाद ५, सातारा १२, बुलडाणा १३, अमरावती १७, कोल्हापूर ९, सांगली २, वाशिम १, जालना १, ठाणे ३, नागपूर ३ व रायगड १. 

Web Title: Lumpy's covid-like mutation; The rate of infection increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.