थोरॅकोस्कोपिक पध्दतीने फुफ्फुसाची शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:10 AM2020-12-26T04:10:19+5:302020-12-26T04:10:19+5:30

शस्त्रक्रियेत उजव्या फुप्फुसातील खालील भाग थोरॅकोस्कोपिक पद्धतीने लहानशा ३ सेंटीमीटर चिरेद्वारे काढला गेला. या अत्याधुनिक शस्त्रक्रियेमुळे रुग्णाला आजारावर मात ...

Lung surgery by thoracoscopic method | थोरॅकोस्कोपिक पध्दतीने फुफ्फुसाची शस्त्रक्रिया

थोरॅकोस्कोपिक पध्दतीने फुफ्फुसाची शस्त्रक्रिया

googlenewsNext

शस्त्रक्रियेत उजव्या फुप्फुसातील खालील भाग थोरॅकोस्कोपिक पद्धतीने लहानशा ३ सेंटीमीटर चिरेद्वारे काढला गेला. या अत्याधुनिक शस्त्रक्रियेमुळे रुग्णाला आजारावर मात करता आली. यापूर्वी १०-१५ सेंटीमीटर लांबीच्या कटद्वारे फुफ्फुसांची शस्त्रक्रिया केली जात होती. ज्यामध्ये मोठे स्नायू आणि बरगडीचा भाग कापला जातो. यामुळे प्रचंड वेदना आणि हळूहळू सुधारणा होतात.

काही काळापासून सर्जन्सनी ही शस्त्रक्रिया ३-४ छोट्या छिद्रांद्वारे करण्यास सुरुवात केली. आणखी एक लहानसा कट देऊन स्पेसीमेन काढला जातो. आता आम्ही एकाच लहानशा कटद्वारे थोरॅकोस्कोपिक पद्धतीने फुफ्फुसांच्या सर्जरी करून त्याच छिद्राद्वारे स्पेसीमेन बाहेर काढतो. या प्रक्रियेत रुग्णाची वेगाने सुधारणा होते व हॉस्पिटलमध्ये राहण्याचा कालावधी कमी होतो, असे खासगी हॉस्पटलचे डॉ. अमित पाटील म्हणाले. सर्जरीच्या अगदी दुसऱ्या दिवसापासून रुग्णाने पुन्हा चालणे व छातीचे व्यायाम करणे सुरु केले. त्यामुळे त्यांच्या एकूण प्रकृतीत लवकर सुधारणा होईल, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

Web Title: Lung surgery by thoracoscopic method

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.