Pune Crime: टास्क पूर्ण केल्यावर नफा देण्याचे आमिष; तरुणाचे ७ लाख खल्लास!
By भाग्यश्री गिलडा | Published: March 8, 2024 02:40 PM2024-03-08T14:40:23+5:302024-03-08T14:40:55+5:30
याप्रकरणी गुरुवारी (दि. ७) कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे....
पुणे : पार्टटाइम जॉबमध्ये टास्क पूर्ण केल्यास चांगला नफा मिळेल असे आमिष दाखवून युवकाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुरुवारी (दि. ७) कोंढवापोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अधिक माहितीनुसार एनआयबीएम परिसरात राहणाऱ्या सुमित सिंग (३१) यांनी कोंढवापोलिसांना फिर्याद दिली आहे. व्हॉट्सॲपच्या माध्यमातून संपर्क साधून युट्युबवरील व्हिडीओ लाईक करण्याचा पार्ट टाइम जॉब आहे. दिलेले टास्क पूर्ण केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवले. त्यानंतर तरुणाला टेलिग्राम ग्रुपमध्ये ऍड करून वेगेवेगळे टास्क पूर्ण करून स्क्रिनशॉट पाठवण्यास सांगितले.
सुरुवातीला टास्कच्या बदल्यात नफा देऊन तक्रारदार यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर अधिक नफा मिळवण्याचे आमिष दाखवून ७ लाख ८ हजार रुपये भरण्यास भाग पाडले. काही कालावधीनंतर मोबदला मिळणे बंद झाल्याने विचारणा केली असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही म्हणून आपली फसवणूक झाल्याचे तक्रारदाय यांच्या लक्षात आले. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार भोसले हे करत आहेत.