लायगूडे दवाखान्यात होते २४ तास लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:11 AM2021-04-04T04:11:10+5:302021-04-04T04:11:10+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : धायरीतील महापालिकेच्या मुरलीधर लायगुडे दवाखान्यात २४ तास लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. दिवसा नागरिकांना ...

Lyagude was vaccinated 24 hours a day at the hospital | लायगूडे दवाखान्यात होते २४ तास लसीकरण

लायगूडे दवाखान्यात होते २४ तास लसीकरण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : धायरीतील महापालिकेच्या मुरलीधर लायगुडे दवाखान्यात २४ तास लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. दिवसा नागरिकांना व रात्री सरकारी कर्मचाऱ्यांना लस देण्यात येते.

वय ४५ च्या पुढे असणार्या सर्वांसाठी लस खुली केल्याने लायगुडे दवाखान्यात लसीकरणासाठी गर्दी होत आहे. गुरूवारी दिवसा व रात्री मिळून १३०० जणांना लस देण्यात आली. शनिवारी सायंकाळी ७ पर्यंत ४६५ नागरिकांना लस दिली गेली.

स्वँब टेस्टिंग साठी येणारे व लसीकरणासाठी येणारे यांना स्वतंत्र कक्ष केले आहेत. लस दिल्यानंतर ३० मिनीटे विश्रांती घेण्यासाठीही स्वतंत्र कक्ष करण्यात आला आहे. सकाळी ७ ते ९ नागरिक व रात्री ९ ते सकाळी ७ या वेळात डॉक्टर, सरकारी, महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी यांना लस देण्यात येते.

Web Title: Lyagude was vaccinated 24 hours a day at the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.