बाळ बोठे यांचे 'ते' पुस्तक अभ्यासक्रमातून हद्दपार ; पुणे विद्यापीठाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2020 06:47 AM2020-12-11T06:47:22+5:302020-12-11T06:50:03+5:30

Rekha Jare murder case; सावित्रीबाई फुले पुणे विद्यपीठाने राज्यशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमासाठी संदर्भ ग्रंथ म्हणून निवडलेले बाळ बोठे यांचे पुस्तक अभ्यासक्रमातून हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे.

m Rekha Jare murder case; Accused Bal Bothe's book expelled, Decision of Pune University | बाळ बोठे यांचे 'ते' पुस्तक अभ्यासक्रमातून हद्दपार ; पुणे विद्यापीठाचा निर्णय

बाळ बोठे यांचे 'ते' पुस्तक अभ्यासक्रमातून हद्दपार ; पुणे विद्यापीठाचा निर्णय

Next

राहुल शिंदे
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यपीठाने राज्यशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमासाठी संदर्भ ग्रंथ म्हणून निवडलेले बाळ बोठे यांचे पुस्तक अभ्यासक्रमातून हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच विद्यापीठाच्या विद्या परिषदेमध्ये सुध्दा पुस्तक रद्द करण्याबाबतची प्रक्रिया पूर्ण केली जाईल,असे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन करमळकर यांनी ‘लोकमत'ला सांगितले.
     यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येतील मुख्य सूत्रधार म्हणून समोर आलेल्या बाळ बोठे यांचे ‘राजकीय
पत्रकारिता’ हे पुस्तक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विषयाच्या ‘पॉलिटिकल जर्नलिझम’ या विशेष अभ्यासक्रमासाठी (एस-2) नेमण्यात आले आहे. गेल्या वर्षापासूनच हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. पुणे विद्यापीठासह विविध विद्यापीठात पॉलिटिकल जर्नलिझम नावाचा पेपर सुरू आहे.
       नवीन विद्यापीठ कायद्यानुसार अभ्यास मंडळातील काही सदस्यांची निवड नॉमिनेशन मधून केली जाते. विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विषयाच्या अभ्यास मंडळाचे सदस्य म्हणून बोठे यांचे नॉमिनेट करण्यात आले होते. विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार गंभीर गुन्ह्यातील घटनेतील आरोपीला विद्यापीठाच्या अधिकार मंडळाच्या बैठकीस उपस्थित राहण्यापासून मज्जाव करता येतो. तसेच अशा व्यक्तीचे सदस्य पद विद्यापीठाचे कुलगुरू रद्द करू शकतात,असे विद्यापीठातील सूत्रांनी सांगितले.

 विद्यापीठाने बाळ बोठे यांचे संदर्भ ग्रंथ म्हणून नियुक्त केलेले पुस्तक रद्द करण्याचा निर्णय घेतला असून विद्या परिषदेच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात येईल. तसेच त्यांचे अभ्यास मंडळ सदस्यत्व रद्द करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल.
- डॉ.नितीन करमळकर, कुलगुरू ,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Web Title: m Rekha Jare murder case; Accused Bal Bothe's book expelled, Decision of Pune University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.