माळीणच्या निकृष्ट कामांसाठी नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 03:52 AM2017-07-30T03:52:21+5:302017-07-30T03:52:29+5:30

पुनर्वसित माळीण गावात निकृष्ट दर्जाचे काम झाल्यामुळे घरांच्या भिंतींना तडे गेले, रस्ते व ड्रेनेजचे चेंबर खचले. मात्र, जिल्हा प्रशासनाकडून याला जबाबदार असणा-या

maalainacayaa-naikarsata-kaamaansaathai-naotaisaa | माळीणच्या निकृष्ट कामांसाठी नोटिसा

माळीणच्या निकृष्ट कामांसाठी नोटिसा

Next

पुणे : पुनर्वसित माळीण गावात निकृष्ट दर्जाचे काम झाल्यामुळे घरांच्या भिंतींना तडे गेले, रस्ते व ड्रेनेजचे चेंबर खचले. मात्र, जिल्हा प्रशासनाकडून याला जबाबदार असणाºया कोणावरही कारवाई करण्यात आली नव्हती. त्यामुळे सर्व क्षेत्रांतून प्रशासनावर टीका केली जात होती. अखेर जिल्हा प्रशासनाने तत्कालीन अभियंत्यांना नोटीस बजावून खुलासा मागविला असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
तीन वर्षांपूर्वी माळीण दुर्घटेनेत पूर्ण गाव मातीच्या ढिगाºयाखाली गाडले गेले. केंद्र व राज्य शासनांसह विविध स्वयंसेवी संस्थांनी माळीणसाठी आर्थिक मदत दिली. त्यामुळे पुनर्वसनाचे कामासाठी जलदगतीने निधी उभा राहिला. नैसर्गिक आपत्तीमुळे कुटुंबातील व्यक्तींसह सर्वस्व गमावणाºया माळीणग्रस्तांना चांगल्या दर्जाची पक्की घरे बांधून देणे अपेक्षित होते; मात्र पुनर्वसित माळीण गावातील घरांच्या भिंतींना पहिल्याच पावसात तडे गेले. रस्ते खचले, घरांच्या भोवतालची माती वाहून गेली. त्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. परंतु, विकसकांकडून घरांची डागडुजी करून दिली जाणार आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन करण्या पलीकडे प्रशासनाने काहीही न केल्याने टीका झाली. त्यामुळे नोटीस बजावण्यात आल्याचे समोर आले आहे.

- सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता आणि जिल्हा परिषदेचे अभियंता यांच्यासह इतर अधिकºयांना जिल्हा प्रशासनाने नोटीस बजावली आहे.
त्यातील दोन अधिकाºयांनी नोटिशीला उत्तर दिले असले, तरी ते समाधानकारक नाही. तसेच, नोटीस बजावूनही उत्तर न देणाºया अधिकाºयांना आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत आपणावर कारवाई का करू नये? अशी विचारणा करण्यात आली आहे.

Web Title: maalainacayaa-naikarsata-kaamaansaathai-naotaisaa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.