टेलरिंग प्रशिक्षण महिलांना मशीन भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:12 AM2021-09-21T04:12:13+5:302021-09-21T04:12:13+5:30

ग्रामपंचायतीच्या वतीने १४ व्या वित्त आयोग निधीतून व रुपश्री महिला विकास संस्थेच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महिलांसाठी टेलरिंग ...

Machine gift to tailoring training women | टेलरिंग प्रशिक्षण महिलांना मशीन भेट

टेलरिंग प्रशिक्षण महिलांना मशीन भेट

googlenewsNext

ग्रामपंचायतीच्या वतीने १४ व्या वित्त आयोग निधीतून व रुपश्री महिला विकास संस्थेच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महिलांसाठी टेलरिंग प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये परिसरातील ७० युवती व महिला सहभागी झाल्या आहेत. दरम्यान, माजी आमदार शरद सोनवणे यांनी या प्रशिक्षण कार्यशाळेदरम्यान भेट दिली. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, वडगाव आनंद ग्रामपंचायतीचा महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा हा उपक्रम स्तुत्य आहे. यावेळी त्यांनी या कार्यक्रमातच सहभागी सर्व ७० महिलांना टेलरिंग मशीन देण्याचे जाहीर केले.

यावेळी अनिल रायकर, किरण शेटे, ग्रामपंचायत सदस्य व ज्येष्ठ समाजसेवक डी.बी.वाळुंज, समीर देवकर सदस्या वैशालीताई देवकर, श्रद्धाताई गडगे तसेच महिला भगिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी.बी.वाळूंज यांनी केले, तर आभार वैशालीताई देवकर यांनी मानले.

200921\img-20210918-wa0253-2.jpg

टेलरिंग प्रशिक्षण कार्यशाळेत माजी आमदार शरद सोनवणे यांचा करण्यात आलेला सत्कार.

Web Title: Machine gift to tailoring training women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.