मदनवाडी-चौफुला जोडे मारून, मुंडण करून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:10 AM2021-05-22T04:10:37+5:302021-05-22T04:10:37+5:30
हक्काचे पाणी मिळेपर्यंत आंदोलन करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला. मदनवाडी चौफुला (ता. इंदापूर) येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको ...
हक्काचे पाणी मिळेपर्यंत आंदोलन करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला.
मदनवाडी चौफुला (ता. इंदापूर) येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, राष्ट्रवादीचे जिल्हा कोषाध्य़क्ष सचिन बोगावत, तालुका उपाध्यक्ष धनाजी थोरात, बाजार समितीचे संचालक आबासाहेब देवकाते, संतोष वाबळे, माजी सभापती हनुमंत वाबळे, तक्रारवाडीचे सरपंच सतीश वाघ, मदनवाडीचे सोसायटीचे चेअरमन विष्णुपंत देवकाते, दादासाहेब वणवे, राजेंद्र देवकाते, अजिंक्य माडगे, सतीश शिंगाडे, संतोष धवडे, जिजाराम पोंदकूले, नितीन काळगे, शरद चितारे, विजयकुमार गायकवाड, रमेश धवडे, संदीप वाकसे, चंद्रशेखर पवार उपस्थित होते.
जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर म्हणाले, इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी उजनी धरणासाठी मोठा त्याग केला आहे. सोलापूर जिल्ह्यावर अन्याय न करता राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यासाठी हक्काचे पाच टीएमसी पाणी मंजुर केले होते. सोलापुर जिल्ह्यातील पदाधिकारी व शेतकऱ्यांच्या दबावाखाली इंदापूरला पाणी देण्याचा निर्णय रद्द करणे अत्यंत दुर्दैवी व इंदापूर तालुक्यावर अन्यायकारक बाब आहे. इंदापूरला हक्काचे पाणी मिळेपर्यंत आंदोलन करू.