मदनवाडीचा तलाव १०० टक्के भरला, दुष्काळी संकट दूर, कार्यकारी अभियंत्यांनी मागणीची घेतली दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 02:01 AM2017-09-16T02:01:23+5:302017-09-16T02:01:39+5:30
चार-पाच वर्षे दुष्काळाच्या आणि पाटबंधारे खात्याच्या अनास्थेच्या झळा सोसणाºया मदनवाडी तलाव १०० टक्के भरला गेल्याने येथील शेतक-यांनी आनंद साजरा केला. तर ‘लोकमत’ने आमचा आवाज पाटबंधारे खात्यांच्या अधिकाºयापर्यंत पोहोचविल्यामुळेच न्याय मिळाला असल्याचे येथील शेतक-यांनी सांगितले.
भिगवण : चार-पाच वर्षे दुष्काळाच्या आणि पाटबंधारे खात्याच्या अनास्थेच्या झळा सोसणाºया मदनवाडी तलाव १०० टक्के भरला गेल्याने येथील शेतक-यांनी आनंद साजरा केला. तर ‘लोकमत’ने आमचा आवाज पाटबंधारे खात्यांच्या अधिकाºयापर्यंत पोहोचविल्यामुळेच न्याय मिळाला असल्याचे येथील शेतक-यांनी सांगितले.
भिगवण परिसरातील मदनवाडी, पोंधवडी आणि भादलवाडी तलाव गेली चार वर्षे दुष्काळाचा सामना करीत आहेत. तर खडकवासला धरण भरूनही गेली तीन वर्ष हे तलाव भरले जात नव्हते. त्यामुळे येथील शेतक-यांची अवस्था बिकट झाली होती. मदनवाडी तलाव १०० भरल्यामुळे सरपंच तुकाराम बंडगर आणि मदनवाडी ग्रामस्थांनी खासदार सुप्रिया सुळे, आमदार दतात्रय भरणे, जिल्हा परिषद सदस्य हनुमत बंडगर आणि शरद चितारे यांचे आभार मानले. लोकमत आणि खडकवासला अभियंता पांडुरंग शेलार यांचेही आभार व्यक्त केले.
अधिकारी मुहूर्ताची वाट पाहतात...
यावर्षी खडकवासला धरण दोन वेळा १०० टक्के भरूनही तलाव भरण्यासाठी पाटबंधारे अधिकारी मुहूर्ताची वाट पाहत होते. यावर शेतक-यांच्या समस्या जाणून घेत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. तसेच आमदार दत्तात्रय भरणे यांनी पाटबंधारे खात्याला वारंवार तलाव भरण्यासाठी सांगितले होते.
तसेच या गटाचे जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर आणि शेतकरीमित्र शरद चितारे यांनी तलाव भरण्यासाठी अधिकाºयांशी संपर्क साधून तलाव भरण्याबाबत मागणी केली होती. तर खासदार सुप्रिया सुळे यांनी पालकमंत्री बापट यांना निवेदन देत शेतकºयांच्या मागणीवरून तलाव तत्काळ भरण्याविषयी सूचना केल्या होत्या.
खडकवासला विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांनी सबंधित अधिका-यांना सूचना देऊन तलाव १०० टक्के भरून घेतला. मदनवाडी बरोबरच पोंधवडी तलाव ही भरूल्याने शेतक-यांनी आनंद साजरा केला.