कौतुकास्पद! माधुरी कानिटकर यांची लेफ्टनंट जनरलपदी निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2020 03:58 AM2020-03-01T03:58:15+5:302020-03-01T03:58:48+5:30

पुण्यातील लष्कराच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या माजी अधिष्ठाता मेजर जनरल माधुरी कानिटकर यांची लेफ्टनंट जनरल या पदावर निवड झाली.

Madhuri Kanitkar elected as Lieutenant General | कौतुकास्पद! माधुरी कानिटकर यांची लेफ्टनंट जनरलपदी निवड

कौतुकास्पद! माधुरी कानिटकर यांची लेफ्टनंट जनरलपदी निवड

googlenewsNext

पुणे : पुण्यातील लष्कराच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या माजी अधिष्ठाता मेजर जनरल माधुरी कानिटकर यांची लेफ्टनंट जनरल या पदावर निवड झाली. अनेक महिन्यांपासून या पदावर त्यांच्या नावाची चर्चा होती. शनिवारी संरक्षण मंत्रालयातर्फे त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. त्या पदावर निवड झालेल्या महाराष्ट्रातील त्या पहिल्या तर देशातील तिसऱ्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. त्या डेप्युटी चीफ इंटीग्रेटेड डिफेन्स सर्व्हिसेस मेडिकलच्या प्रमुख म्हणून काम सांभाळतील.
माधुरी कानिटकर पुण्यातील लष्करी महाविद्यालयाच्या पहिल्या महिला अधिष्ठाता होत्या. सध्या त्या उधमपूरच्या युद्ध चिकित्सा विभागाच्या प्रमुख आहेत. शनिवारी लष्करी वैद्यकीय सेवेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल अनुप बॅनर्जी, तसेच त्यांचे पती माजी लेफ्टनंट जनरल राजीव कानिटकर यांच्या हस्ते त्यांना लेफ्टनंट जनरल पदाची रँक बहाल करण्यात आली.
कानिटकर यांनी १९८० मध्ये एमएमबीबीएस मधून पदवी घेतली. त्यानंतर, त्यांनी पीडियाट्रिक्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केले. जवळपास चार दशके लष्कराच्या मेडिकल सर्व्हिस क्षेत्रात काम केल्यानंतर, त्या लष्करातील पहिल्या ट्रेन पीडियाट्रिक नेफ्रोलॉजिस्ट व नंतर लष्कराच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता बनल्या. त्यांनी लष्कराच्या वैद्यकीय सेवेत बाल चिकित्सा नेफ्रोलॉजी विभाग सुरू केला. त्यांचे पती राजीव कानिटकर लष्करातून निवृत्त झाले आहेत.

Web Title: Madhuri Kanitkar elected as Lieutenant General

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.