Madhuri Misal State Minister: पुण्यातून माधुरी मिसाळ यांना दुसऱ्या महिला राज्यमंत्री होण्याचा मान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 18:11 IST2024-12-15T18:10:30+5:302024-12-15T18:11:28+5:30
पुण्याच्या पर्वती विधानसभा मतदार संघातून २००९ ते २०२४ अशी सलग चार वर्षे माधुरी मिसाळ यांनी यश मिळवले आहे

Madhuri Misal State Minister: पुण्यातून माधुरी मिसाळ यांना दुसऱ्या महिला राज्यमंत्री होण्याचा मान
पुणे : पुणे शहरातून दुसऱ्या महिला राज्यमंत्री होण्याचा मान पर्वतीच्याआमदार माधुरी मिसाळ यांनी मिळवला आहे. पर्वती विधानसभा मतदार संघातून सलग तीन वेळा निवडून आल्यानंतर यंदा चौथ्यांदा आमदार होण्याचा मान त्यांनी मिळवला. त्यानंतर त्यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली असून मिसाळ यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
पुण्यातून काँग्रेसच्या लीला मर्चंट या पहिल्या महिला आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांनतर १९७८ साली पुलोद सरकार असताना शांती नाईक यांना पहिले महिला मंत्रिपद देण्यात आले होते. तर आता माधुरी मिसाळ यांनी पहिल्या दुसऱ्या राज्यमंत्री होण्याचा मान मिळवला आहे. २००९ पासून माधुरी मिसाळ पर्वती विधानसभेतून ३ वेळा निवडून आल्या आहेत. २०२४ साली निवडून येण्याची त्यांची चौथी वेळ आहे. २०१४ च्या निवडणुकीत कोथरूड, पर्वती आणि कसबा विधानसभेतून ३ महिला आमदार निवडून आल्या होत्या. पण त्यावेळी या तीन महिलांना मंत्रिपद देण्यात आले नव्हते. आता मात्र मिसाळ यांना मंत्रिपद दिल्याने पुणेकर भगिनींची मान उंचावली आहे.
माधुरी मिसाळ यांचा राजकीय प्रवास
कसबा मतदारसंघातून २००७ मध्ये पहिल्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर २००९ मध्ये त्यांना पर्वती मतदारसंघात आमदारकीचं तिकीट मिळाले. तेव्हापासून त्या पर्वती मतदारसंघाच्या आमदार म्हणून काम करत आहेत. २००९ ते २०२४ अशी सलग चार वर्षे त्यांनी पर्वती मतदारसंघातून यश मिळवले. सलग चौथ्या टर्मसाठी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव महिला आहेत.
शहरातील पहिल्या महिला मंत्री
पुणे शहरातील आता पर्यत अनेक महिला आमदार झाल्या आहेत. पण महिला आमदारांमध्ये फक्त शांती नाईक यांना संधी देण्यात आली होती. आता माधुरी मिसाळ यांना पुणे शहरातील दुसऱ्या महिला मंत्री होण्याचा मान मिळाला आहे. राज्यात आता पर्यत ९ महिला कॅबिनेट मंत्री तर १२ महिला राज्यमंत्री झाल्या आहेत.