खंडाळ्यात मदुराई एक्स्प्रेसला अपघात, बोगी घसरल्यानं वाहतुकीवर परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2018 07:23 AM2018-07-06T07:23:29+5:302018-07-06T14:47:50+5:30
खंडाळा येथे मदुराई एक्स्प्रेसची बोगी घसरली आहे. यामुळे मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
पुणे - मुंबई-पुणे लोहमार्गावर खंडाळा रेल्वे स्टेशनजवळ मदुराई एक्स्प्रेसचा शुक्रवारी (6 जुलै) पहाटे 2.45 वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. यामुळे मुंबई-पुणे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.
लोकमान्य टिळक मुंबई ते मदुराई एक्स्प्रेस खंडाळा घाट चढून येत असताना खंडाळा रेल्वे स्टेशनजवळ गाडीच्या मागील बँकरची जोरदार धडक मागील डब्याला बसल्याने हा अपघात झाला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, बोगीचे प्रचंड नुकसान झाले आहे. या अपघातामुळे अप लाईनवरील वाहतूक विस्कळीत झाल्यानं रेल्वे सेवा उशिरानं सुरू आहे. मदुराई एक्स्प्रसेची घसरलेली बोगी हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.
दरम्यान, या अपघातामुळे पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेस, पुणे -मुंबई प्रगती एक्स्प्रेस, पुणे-कर्जत व कर्जत पुणे शटल, भुसावळ पुणे एक्स्प्रेस व मुंबई पुणे, पुणे मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.
#SpotVisuals: Seating cum Luggage Rake (SLR) coach of Madurai express derailed in Maharashtra's Khandala at around 3:30 am. The affected coach was detached from the train & services were resumed within an hour. Traffic on other routes wasn't affected. No injuries reported pic.twitter.com/UoYP6H21uE
— ANI (@ANI) July 6, 2018
Seating cum Luggage Rake (SLR) coach of Madurai express derailed in Maharashtra's Khandala at around 3:30 am. The affected coach was detached from the train & services were resumed within an hour. Traffic on other routes wasn't affected. No injuries reported
— ANI (@ANI) July 6, 2018