महा ई-सेवा केंद्रावर छापा, बोगस आधार नोंदीप्रकरणी चौघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 02:43 AM2017-12-02T02:43:23+5:302017-12-02T02:43:27+5:30
चाकण येथे महा ई-सेवा केंद्रावर पोलीस आणि प्रशासन यांनी छापा टाकत बोगस आधार नोंदणी केल्या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. बोगस आधारकार्ड आणि आधारकार्डसाठी जादा रक्कम घेत असल्याच्या लेखी तक्रारी जिल्हा अधिकारी आणि खेड उपविभागीय अधिकारी यांच्या कडे तक्रारी आल्या होत्या.
राजगुरुनगर : चाकण येथे महा ई-सेवा केंद्रावर पोलीस आणि प्रशासन यांनी छापा टाकत बोगस आधार नोंदणी केल्या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. बोगस आधारकार्ड आणि आधारकार्डसाठी जादा रक्कम घेत असल्याच्या लेखी तक्रारी जिल्हा अधिकारी आणि खेड उपविभागीय अधिकारी यांच्या कडे तक्रारी आल्या होत्या. यादी दखल घेत उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
चाकण येथे वेदांत संकुल नावच्या इमारतीत गाळा, नंबर १६ मध्ये महा ई-सेवा केंद्रचालक नागरिकांकडून पैसे घेऊन कोणतेही कागदपत्र न घेता त्यांना आधार कार्ड नोंदणी करीत होता.
याबाबत उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तक्रारी आल्या होत्या. यांची शहानिशा करण्यासाठी नायब तहसीलदार लता चंद्रकांत वाजे, पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव, सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार, इतर पोलीस कर्मचाºयांसह सापळा रचला. त्यानुसार पोलिसांनी कार्तिक रमेश देशमुख (वय १९, रा. भुजबळ आळी, चाकण) याला याबाबतची ती माहिती सांगून कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन केले. त्याच्याकडे ५०० रुपयांची नोट देऊन, नोट क्रंमाक घेऊन त्याच्याकडे कोणतेही आधार कार्ड काढण्यासाठी योग्य ती कागदपत्रे दिली नाही. तसेच त्याला आधार कार्ड काढण्यासाठी वेदांत संकुल येथे पाठविले.
कार्तिक देशमुख आधार काढण्यासाठी रांगेत उभा राहिला. दरम्यान, पोलीस त्याच्या संपर्कात होते. त्यांच्याकडून या महा-सुविधा केंद्रात आधारकार्ड नोंदणी करण्यासाठी कुठलीही कागदपत्रे न देता २०० रुपये घेऊन अक्षय विजय ढमढेरे (रा. जुंबकरवस्ती, चाकण यांच्या नावाने आधार नोंदविले.
दरम्यान, कार्तिक देशमुख याने हाताने इशारा करून पोलिसांना बोलाविले. बोगस नोंद केल्याचे आढळल्याने चौघांना ताब्यात घेण्यात आले. बनावट आधार कार्डची माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करून इंंटरनेटवर आॅनलाईन खोटी नोंदणी खोटा दस्तऐवज तयार केल्याप्रकरणी नायब तहसीलदार लता वाजे यांनी चाकण पोलीस ठाण्यात कायदेशीर तक्रार दिली आहे.
सापळा रचून केली कारवाई
माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करून कोणतेही कागदपत्रे न घेता व वरील नावाने आधार नोंद केल्याचे लक्ष्यात आले. पोलिस व नायब तहसिलदार व पोलिस कर्मचाºयांनी सुविधा केद्रांमध्ये प्रवेश केला.
या केंद्रात सागर दत्तात्रय लोखंडे (वय २२, रा. मरकळ ता.खेड), दर्शन मुकुंद कर्नावट (वय २३, रा. सोळू .ता खेड), मंगेश छगल येवले (वय २३, रा. शेल - पिंपळगाव ता खेड), नंदकुमार संतोष जमदाडे (वय २२, रा. मेदनकरवाडी ता खेड) यांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी ड्रावरमधून रोख रक्कम २० हजार रुपये, दोन लॅपटॉप, दोन प्रिंटर मशीन, दोन हताचे ठसे घेण्याचे मशीन, दोन डोळ्याचे फोटो काढण्याचे मशीन असा ६० हजार रुपायांचा मुद्देमाल जप्त केला.